Press "Enter" to skip to content

मुरूड येथे विक्रीसाठी ठेवलेले पपई गाईने खाल्ल्याने गायीवर चाकूने हल्ला

सिटी बेल लाइव्ह । मुरूड । अमूलकुमार जैन ।

रायगड जिल्ह्यातील मुरुड शहरात असणाऱ्या बाजारपेठ येथे विक्रीसाठी ठेवलेले पपई गाईने खाल्ले या गोष्टीचा राग येऊन पस्तीस वर्षीय फळ विक्रेता (राहणार:-शिघ्रे, तालुका-मुरुड,मूळ राहणार-रामराज,तालुका-अलिबाग)याने गायीवर चाकूने हल्ला करीत जखमी केले.

याप्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात नरेश शांताराम खेडेकर (राहणार-डोंगरी, पोस्ट-राजपुरी,तालुका-मुरुड )यांनी तक्रार दाखल केली आहे.

याबाबतची हकीगत अशी आहे की,मुरुड शहरातील बाजारपेठ येथील पुरकर नाका येथे आरोपी फळ विक्रेता हा त्याच्या दुकानात फळ विक्रीकरिता ठेवलेले पपई रस्त्यावरील गाईने खाल्ले या गोष्टीचा राग आल्याने त्याने दुकानात असलेल्या सुऱ्याने क्रूरतेने गाईच्या मागील उजव्या पायाच्या मांडीवर वार करीत तसेच डावीकडे पोटात खुपसून दुखापत केली. सदर घटनेची खबर मिळताच अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांनी तात्काळ मुरुड येथे भेट दिली.

याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात 4/2021,भा.द.वि.कलम 428,429प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960चे कलम 11(1)(अ ) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 119नव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास मुरुड पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनवे करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.