Press "Enter" to skip to content

पाटणसई विसर्जन घाट सुशोभीकारणासाठी ३ लाख निधी


किशोर जैन यांनी सरपंच व उपसरपंच यांना दिले मंजुरीचे पत्र

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

रोहा तालुक्यातील पाटणसई ग्रामपंचायती हद्दीतील वाकण येथील विसर्जन घाटाच्या सभोवताली सुशोभीकरण करण्यासाठी किशोर जैन यांच्या प्रयत्नाने रा,जि.प.च्या सेस फंडातून ३ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शिवसेनेचे सुरेश गायकर यांची पाटणसई उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे औच्चित्त साधून रा.जि.प.चे सदस्य किशोर जैन यांनी जि.प,च्या सेस फंडातून ग्रामपंचायतीच्या वतीने वाकण येथे नदीच्या काठावर सुंदर असं गणपती विसर्जन घाट बांधण्यात आले असुन या विसर्जन घाटाच्या सभोवताली सुशोभीकरण करण्यासाठी मंजूर केलेल्या ३ लाखाच्या निधीचे मंजुरी पत्र मंगळवार १६ फेब्रुवारी रोजी सरपंच माधवी गायकर व नवनिर्वाचित उपसरपंच सुरेश गायकर यांच्याकडे सुपुर्त करण्यात आला.

यावेळी रोहा पं.स.सदस्य संजय भोसले,माजी सभापती सदानंद गायकर,पेण तालुका संघटिका दर्शना जवके,छबिलदास कोतवाल,विजय गायकर,प्रवीण दाभाडे, शशिकांत गायकर,देवेंद्र गायकर,गणपत राणे,रामदास कोतवाल, अशोक भोय तसेच सर्व ग्रा.पं.सदस्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. निधी दिल्याबद्दल ग्रामस्थांनी किशोर जैन यांचा सत्कार करून आभार मानले. तसेच उपसरपंच पदाच्या निवडीनंतर विलास गोळे,कृष्णा धामणे,विठोबा शिर्के,प्रकाश मोरे, दयानंद गायकर,लहू तेलंगे,रमेश भिसे,कीर्तीकुमार कळस,बाळू रटाटे,सुभाष मढवी,पांडुरंग पिंगळा,संतोष म्हात्रे,उल्हास म्हात्रे,विनोद मोदी,मिलिंद गायकर, बंधु राणे,मनोज वाघमारे आदि मान्यवरांनी भेटून शुभेच्छा दिल्याची माहिती सुरेश गायकर यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.