सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे ।
परमपूज्य ॐदत्त श्रीठाकूरमहाराजांच्या नवेपोपुड,उरण येथील दत्तमंदिरात ॐदत्त परिवारातील पल्लवी पराग म्हात्रे- उपसरपंच व गुरुभगिनींनी तर्फे हळदीकुंकवाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.नवनियुक्त सरपंच रंजना पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला.


ओम दत्त परिवारातील शिष्य वर्गां तर्फे वर्षभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते त्याचाच एक भाग म्हणून तसेच स्त्रियांविषयी आदर भाव व्यक्त करण्याच्या दृष्टीकोणातून दरवर्षी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. रश्मी राकेश म्हात्रे , अश्विनी अनिल म्हात्रे , प्राची घरत , प्रतीक्षा चेतन म्हात्रे , माधवी विकास घरत या सर्वांच्या मदतीने हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला.








Be First to Comment