Press "Enter" to skip to content

रायगड जिल्हा परिषद यांच्यावतीने “आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार

स्वच्छ सुंदर गाव स्पर्धेत मेढा ग्रामपंचायत तालुक्यात प्रथम, 10 लाख पुरस्काराची मानकरी

सिटी बेल लाइव्ह । रोहे । नंदकुमार मरवडे/उदय मोरे ।

रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांच्यावतीने “आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार वितरण सोहळा आज रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती ताई तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी रोहा तालुक्यात स्वच्छ सुंदर गाव पुरस्कार स्पर्धेत मेढा ग्रामपंचायतीला तालुक्यात प्रथम क्रमांकाची मानकरी ठरले असून दहा लाखाचा पुरस्कार व सन्मानपत्र देऊन राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

सदर पुरस्काचा स्विकार सरपंच स्नेहा महेंद्र खैरे यांनी केला. त्यांच्या समवेत माजी सभापती लक्ष्मण महाले ग्रामविकासाचे खरे शिल्पकार युवा नेते मयुर खैरे, माजी सरपंच भगवान गोवर्धने, ग्रामपंचायतीचे जेष्ठ सदस्य तथा पत्रकार उदय मोरे, सदस्य रविंद्र जाधव सदस्या श्रेजल उंबरे, नम्रता महाले, ग्रामसेवक अमोल तांबडे, कर्मचारी छगन लाड यांनी पुरस्कार स्विकारला.

यावेळी विधानपरिषद शिक्षक आमदार बाळाराम पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा कुमारी योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे, प्रतोद ऍड. आस्वाद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, सभापती गिता जाधव, नरेश पाटील विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे आदी मान्यवर व्यासपीठावर पुरस्कार वितरणप्रसंगी उपस्थित होते.

ग्रामपंचायतीचा कारभार हा “स्वच्छ सुंदर सर्वदा” ह्या युक्ती प्रमाणे चालत असल्याने आज रोहा तालुक्यातुन प्रथम क्रमांक येण्याचा बहुमान मेढा ग्रामपंचायतीला लाभला असल्याने तब्बल १० लक्ष एवढा भरीव पारितोषिक गावाला पारितोषिक स्वरूपात भेटल्याने पुन्हा एकदा गावाचा विकास द्विगणित होण्यास चालना मिळणार आहे.
पुरस्कार प्राप्त होण्यासाठी गावच्या सरपंच तसेच सर्वच जेष्ठश्रेष्ठ समाजसेवक, सदस्य तरुणमंडळ, बचतगट ग्रामपंचायत हद्दीतील सर्वच नागरिकांनी खारीचा वाटा उचलला पुरस्कार प्राप्त झाल्याने मेढा ग्रामपंचायतीची मान उंचावली असून सर्वच स्तरातून सरपंच, उपसरपंच, सदस्य ग्रामसेवक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.