सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
खालापूर तालुक्यातील १७ प्राथमिक शाळांमधून इंग्रजी भाषा वर्ग गोदरेज एंड बॉयेस कंपनीच्या पुढाकारातून सुरू होणार असल्याचे उपसभापती विश्वनाथ पाटील यांनी सांगितले.
जिल्हा परिषद रायगड , कराडी पाथ लर्निंग प्राइवेट लिमिटेड चेन्नई आणि गोदरेज यांच्या संयुक्तिक उपक्रमातून खालापुर ग्रामीण तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी या विषयवार सोप्या ,नावीन्यपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण घेता येणार आहे.
बदलत्या काळात इंग्रजी बाबतचे महत्व आता पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये वाढत आहे,पण आर्थिक परिस्थितिमुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेणे सर्वाना शक्य नसते, त्याच बरोबर जिल्हा परिषद् शाळेतून विद्यार्थी गळती ची संख्या ही मोठ्या प्रमाणात कमी प्रमाण होताना दिसत आहे.आता गरज आहे ती आशा अनेक नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त उपक्रमांची जेणेकरून विद्यार्थी शाळेत टिकून राहतील आणि चांगले शिक्षण ही मिळेल.इंग्रजी हा विषय म्हणून नव्हे तर भाषा म्हणून शिकवला गेला तर विद्यार्थ्यांमध्ये याबाबत गोड़ी निर्माण होईल, नेमकी हीच गरज ओळखून , गोदरेज नी आपल्या सी.एस.आर. कार्यक्रम अन्तर्गत इंग्रजी बिषय खालापुर तालुक्यातील १७ शाळांमध्ये राबवण्यासाठी आर्थिक सहकार्य केले आहे. कराडी पाथ ही नामांकित संस्था हा कार्यक्रम पुढील तीन वर्षे राबवणार आहे यासाठी जिल्हा परिषद् रायगड यांचे व शिक्षण विभाग यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.रायगड जिल्हा परिषद शाळांसाठी अशा प्रकारचा उपक्रम जिल्ह्यामधे प्रथमच असेल.
गाणी , कृति, अभिनय , वाचन ,लेखण आणि दृकश्राव्य माध्यमातून इंग्रजी भाषा प्रभावीपणे मुलांमध्ये अवगत करून देणे हा मुख्य उद्दिष्ट्य आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण , साहित्य , भेटी आणि वर्कशॉप्स आयोजित करण्यात येणार आहेत. नुकताच कार्यक्रमचा शुभारंभ पंचायत समिति खालापुर आणि गोदरेज पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उदघाटन त्रिपक्षीय करारावर सह्या करुण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वृषाली पाटिल सभापती पंचायत समिती खालापुर आणि प्रमुख पाहुणे अश्विनी देवदेशमुख ,प्रमुख सी.एस.आर. विभाग गोदरेज एंड बॉयस म्हणून उपथित होत्या.उपसभापती विश्वनाथ पाटिल, भाऊसाहेब पोळ गट शिक्षण अधिकारी,पंचायत समिति खालापुर, राजेंद्र पाशीलकर, प्रफुल्ल मोरे,तानाजी चव्हाण ,उदय कुमार,आदित्य अनवट कराडी पाथ यांच्यासोबत अनेक मान्यवर उपस्थित होते.








Be First to Comment