कमलाकर शिंदे यांनी कर्तृत्ववान विद्यार्थी घडविले – जिप सदस्य सुरेश खैरे
सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत ।
देशातील कर्तृत्ववान व राष्ट्राप्रति योगदान देण्याचे सामर्थ्य शिक्षकात आहे.सुधागड तालुक्यातील राजीप पाच्छापूर शाळेचे मुख्याध्यापक कमलाकर शिंदे यांनी आपल्या 39 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत असंख्य कर्तृत्ववान विद्यार्थी घडविले आहेत. शिक्षक संघटनेमध्ये देखील प्रभावीपणे काम केले असल्याचे मत जिप सदस्य सुरेश खैरे यांनी व्यक्त केले. शिंदे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा येथील मराठा समाज सभागृहात नुकताच संपन्न झाला. यावेळी खैरे बोलत होते.
सुरेशशेठ खैरे पुढे मार्गदर्शनात म्हणाले की शिंदे आणि मी लहानपणापासूनचे मित्र आहोत. त्यांनी अत्यंत गरीब परिस्थितीत शिक्षण घेतले. ते अतिशय मोकळ्या स्वभावाचे आहेत. त्यांनी अनेक शिक्षकांना न्याय मिळवून दिला आहे. यानंतर सामाजिक व राजकीय काम करत रहा व सर्वत्र फिरा असे सांगून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
हा सत्कार सोहळा सुधागड तालुका शिक्षक समन्वय समिती, प्रेरणा स्वयंसेवी संस्था व स्वप्नपूर्ती गृहनिर्माण सोसायटी यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला होता.
पाली-सुधागड पंचायत समिती सभापती रमेश सुतार म्हणाले की शिक्षक सेवेत शिंदे यांनी वेगळी उंची मिळविली आहे. तळागाळातील विद्यार्थ्यांना घडविले आहे. याबरोबरच जनजागृती देखील केली आहे असे सांगितले. पंचायत समितीच्या माध्यमातून जानेवारी 2021 पासून सेवा निवृत्त होणाऱ्या शिक्षकांचा सन्मान पत्र देऊन सत्कार करण्याची घोषणा सभापती रमेश सुतार सदर कार्यक्रमा प्रसंगी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष ग. रा. म्हात्रे म्हणाले की शिंदे यांनी शिक्षक संघटनेचे काम अत्यंत निष्ठेने केले आहे. त्यांचे कर्तृत्व महान आहे. सहकार, शिक्षण क्षेत्र व शिक्षक संघटनेत प्रभावीपणे काम केले आहे. सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र पाटील म्हणाले की कमलाकर शिंदे हे हजारो हृदयांमध्ये वसलेले शिक्षक आहेत. माजी सभापती साक्षी दिघे म्हणाल्या की शिंदे यांनी आपल्या स्वभावामुळे सर्व लोकांना आपलेसे केले आहे. शिंदे यांचा विद्यार्थी निलेश शिर्के यांनी शाळेतील आठवणी जगविल्या. तर कमलाकर शिंदे म्हणाले की अत्यंत हलाखीच्या परिस्थिती जीवनाची सुरुवात झाली. घरातल्यांचा पाठींबा व अनेक जणांचे सहकार्य लाभले म्हणून इथपर्यंत पोहोचलो असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सतीश खाणेकर यांनी केले, तर आभार अनिल राणे यांनी मानले.
या कार्यक्रमास जिप सदस्य सुरेश खैरे, सभापती रमेश सुतार, माजी सभापती साक्षी दिघे, शिवसेना नेते राजेंद्र राऊत, तहसीलदार दिलीप रायन्नावार, विक्रीकर निरीक्षक अमोल कांबळे, दिनेश चिले, किशोर दिघे, चंद्रकांत घोसाळकर, राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्रा.शिक्षक परिषद राजेश सुर्वे, रायगड जिल्हा अध्यक्ष प्रा.शिक्षक संघ (शिवाजी गट), राजेंद्र म्हात्रे, राजेश जाधव, सुभाष भोपी, जयदास घरत, जयश्री म्हात्रे सर्व संचालक पेण प्रा.शिक्षक सहकारी पतपेढी पेण, जिल्हा अध्यक्ष शिक्षक परिषद संजय निझापकर, नायब तहसीलदार गजानन मोकल, वरिष्ठ विस्तार अधिकारी संतोष शेडगे, गट शिक्षण अधिकारी रोहा साधूराम बांगारे, उमेश विचारे, सुधाकर करकरे, विजय येलवे, नारायण गायकर रोहा, राजेंद्र मोकल, कृष्ण कुमार शेळके, शरण पाटील, नवनाथ धुमाळ, मोरेश्वर कांबळे, राजेश जाधव, अनिल राणे, उमेश विचारे, हरिश्चंद्र पाटील, आरिफ मणियार, संजोग शेठ, राजेंद्र म्हात्रे, राजेश सुर्वे, सुरेंद्र शिंदे, राजेंद्र अंबिके यांच्यासह कुटुंबीय, नातेवाईक, मित्र परिवार, माजी विद्यार्थी व तालुक्यातील नागरिक, तालुक्यातील 250 प्रा. शिक्षक आणि रायगड जिल्हा आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्हयातून शिक्षक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment