सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
रयत शिक्षण संस्थेचे,तु.ह.वाजेकर विद्यालय फुंडे येथे उरण महालण विभागाचे शिक्षण महर्षी तुकाराम हरी वाजेकर यांची 40 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
उरण तालुक्यातील महालण विभागातील दहा गावातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून फुंडे महालण हायस्कूलची स्थापना करून खऱ्या अर्थाने कर्मवीर अण्णांचा वारसा चालवून, उरणचे राजे आणि शिक्षण महर्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वीर वाजेकारांची 40 वी पुण्यतिथी विद्यालयात संपन्न करण्यात आली.

यावेळी विद्यालयाचे चेअरमन कृष्णाजी कडू, प्राचार्य श्री.मोहन पाटील, पर्यवेक्षक सौ.आशा मांडवकर, श्री.जी.सी.गोडगे, ज्युनिअर प्रमुख श्री.व्ही.के.कुटे, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.एच.एन.पाटील, सौ.दर्शना माळी आणि सर्व शिक्षक वृंद यांच्या शुभहस्ते वाजेकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

त्यानंतर प्रत्येक वर्गशिक्षकांनी आपापल्या वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना वीर वाजेकरांच्या कार्याची महती सांगितली. प्रत्येक वर्गातील दोन-दोन विद्यार्थ्यांनी वाजेकरांच्या जीवनावर आधारित भाषणे केली.अशा रीतीने फुंडे हायस्कूलमध्ये वाजेकर पुण्यतिथीचा सोहळा संपन्न झाला.








Be First to Comment