जिल्हा व तालुका नवीन कार्यकारणीचा झाला सत्कार
सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
रोहा तालुक्यातील खांब येथील खांब विभागीय नाभिक संघाची सभा विश्वास मोहिते यांच्या निवासस्थानी संपन्न झाली. खांब विभागीय अध्यक्ष राहुल मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व तालुका कार्यकारणीमध्ये निवड झालेल्या रोहा तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या सत्कार समारंभासाठी या खास सभेत आयोजन करण्यात आले.
यावेळी सर्व समाज बांधवांनी एकसंघ रहा तालुका कार्यकारणी सोबत असल्याचे तालुका अध्यक्ष प्रवीण पवार यांनी सांगितले. यावेळी केशव मोहिते, नथुराम खराडे,प्रदीप मोहिते,प्रमोद मोहिते,दीपक खराडे,संतोष मोहिते, विवेक मोहिते,जयेश मोहिते तसेच शर्मिला मोहिते,शोभा मोहिते,विनया मोहिते,प्रज्ञा मोहिते,रिया मोहिते यांच्यासह विभागातील समाज बांधव व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सभेची प्रस्तावना ऐश्वर्या मोहिते हिने केले असून जिल्हा व तालुक्यात नव्याने निवड झालेल्यामधील रायगड जिल्हा विश्वस्त जनार्दन मोरे,जिल्हा सचिव महेंद्र माने,जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद जाधव,जिल्हा संघटक नीलेश खंडागळे,तालुका अध्यक्ष प्रवीण पवार,उपाध्यक्ष दिलीप मोहिते,सचिव संदीप दिवेकर,सल्लागार विनोद मोहिते,खजिनदार राकेश सकपाळ, सहखजिनदार संदेश खराडे,माजी तालुका अध्यक्ष रविंद्र टके,कोलाड विभाग अध्यक्ष संजय सकपाळ,सलून अध्यक्ष किशोर खंडागळे या पदाधिकार्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी संदीप दिवेकर,जनार्दन मोरे,महेंद्र माने आदि मान्यवरांनी आपले विचार मांडले.उपस्थितांचे आभार राहुल मोहिते यांनी मानले.








Be First to Comment