सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
डायोसिस ऑफ बिलिव्हर्स ईस्टर्न ट्रस्ट यांच्याकडून कसलखंड ग्रामपंचायत हद्दीतील शिवाजीनगर फणसवाडी येथील वयोवृद्ध, अपंग आदिवासी बांधवांना शिवानी हेरिटेज सोसायटी आष्टे येथे ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले.
महिनाभरात थंडी वाढल्याने बिलिवर्सं इस्टर्नं ट्रस्टच्यावतीने उघड्यावर झोपणारे, गोरगरीब गरजू ,नाका कामगार,आदीवासी बांधव आदींना ब्लॅकेट वाटप केले जात आहे.उघड्यावर राहणा-यांचा थंडीपासून बचाव व्हावा या हेतूने बिलिवर्सं इस्टर्नं ट्रस्टच्यावतीने ब्लॅकेट,स्वेटर आदी उबदार कपडे वाटप करण्यात येत आहे.
शिवाय लाॅकडाऊनपासून गोरगरीब आदिवासी वाटसरू अशा अनेक गरजवंताना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचे काम सुरू आहे. दान जवळ असून फायदा नाही तर गोरगरीबांपर्यंत दान देण्याची दानत असायला हवी हीच जाणं ह्या संस्थेकडे आहे असे माजी उपसरपंच अनिल काठावले यांनी बोलताना सांगितले.
या कार्यक्रमासाठी फादर बेन्नी ईप्पन डायसीस इन्चार्ज, फादर आनंद डी.वर्मां, प्रिन्सिपल,ब्रदर बिजू वर्गीस, शिवानी हेरीटेज सोसायटी चेअरमन माजी उपसरपंच महादेव पाटिल, पनवेल तालुका इंटक अध्यक्ष दिपक ठाकुर, माजी उपसरपंच अनिल काठावले, सामाजिक कार्यकर्ते संदीप काठावले, नवनाथ गायकवाड, विजय शेलार, गणेश गायकर, विकास जोशी आदी उपस्थित होते.यावेली आदीवासी बांधवांचा ब्लॅकेट मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण दिसून आले.








Be First to Comment