सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
ब्रम्हलिन गुरुवर्य बालाराम महाराज कांबेकर व हभप बालकृष्ण महाराज पाटील तसेच हभप अनंत महाराज पारंगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवनगर येथील श्री गणेश मंदिरात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण अध्याय ९ वा आणि १२ वा सोहळा उत्साहात संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठ नेतृत्व हभप पांडुरंग महाराज म्हात्रे,हभप निवृत्ती महाराज मुंढे,हभप जानू महाराज पवार,हभप तुकाराम महाराज मुंढे,हभप जनार्दन महाराज पारंगे,हभप बालाराम महाराज कुरंगले यांनी केले.यानंतर हभप रविंद्र सावंत,के.एम.पाटील,हभप बबन सावंत ,हभप धर्मां महाराज भोईर,हभप हरिभाऊ महाराज गडगे यांच्यावतीने सामुदायिक हरिपाठाचा कार्यक्रम पार पडला.तर हभप निवृत्ती महाराज मुंढे यांचे सुश्राव्य हरिकिर्तंन झाले.
यावेळी मृदंगमणीचे काम हभप के.एम.पाटील, पांडुरंग राऊत, भास्कर म्हस्कर यांनी पाहिले.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी हभप महादेव कोडींलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवनगर ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले.








Be First to Comment