Press "Enter" to skip to content

भ्रमण मंडळ हास्य क्लबचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।

कर्जत भ्रमण मंडळ हास्य क्लब या संस्थेचा सोळावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कर्जत भ्रमण मंडळ हास्य क्लब व्यासपीठावर प्रमुख पाहुणे निलेश चौडीया, मंडळाचे अध्यक्ष मुकुंद मित्रगोत्री, कार्याध्यक्ष मधुकर घरत कोषाध्यक्ष जयेश शहा, माजी अध्यक्ष रामक्रुष्ण मोकल हे होते. मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलन व श्रीगणेशाचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन गत वर्षी दिवंगत झालेले मंडळाचे सदस्य, सामाजीक कार्यकर्ते, राजकीय नेते यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

मित्रगोत्री यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे चौडीया यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात मंडळाचा गत वर्षिचा कामाचा अहवाल वाचन मंडळाचे सचिव सुहास प्रधान यांनी केले. जमा खर्चाचे वाचन कोषाध्यक्ष शहा यांनी केले. या कार्यक्रमात विविध प्रकारचे खेळ, करमणुकीचे कार्यक्रम करण्यात आले. सर्व सदस्यांनी त्यात सहभाग घेऊन आनंद साजरा केला.

मंडळाचे कार्यकारीणी सदस्य मुकुंद भागवत यांना उल्हास नदी प्रदुषण मुक्त व शुन्य कचरा अभियाना बाबत माहीती दिली. रमेश खैरे, मुकुंद टुमणे, सविता जोशी या सदस्यांनी हास्य क्लब बाबत आपले मनोगत व्यक्त कले व हास्य क्लब मुळे होणारे फायदे सांगीतले. भ्रमण मंडळाचे जेष्ठ सदस्य भरत शहा व छगन ओसवाल यांचा वाढदिवस पण साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रधान यांनी केले. उपस्थित सर्व सदस्यांनी त्यांचेवर हास्य पुष्प व्रुष्ठी करुन दोघांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सुर्यकांत शहा, सुरेखा प्रधान, शिला घरत, संगिता गोडबोले, शर्मिला नारकर, माधवी मित्रगोत्री आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.