Press "Enter" to skip to content

उरण शहरात बस सुरू होण्यासाठी मा आ मनोहर भोईर यांचे प्रयत्न

एसटी व एनएमएमटी बस सेवा उरण-मोरा (एन. ए. डी), उरण-करंजा मार्गावर सुरू करण्याची परिवहन मंञ्यांकडे मागणी

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।

गेली अनेक महिन्यापासून बंद असलेल्या उरण-मोरा(एनएडी) उरण-करंजा एसटी व एनएमएमटी बस उरण शहरात सुरू करण्यासाठी माजी आमदार मनोहरशेठ भोईर हे संबधित खात्याच्या अधिकारी यांना पत्र-व्यवहार करून सतत पाठपुरावा करीत आहेत.

परिवहनमंत्री अनिल परब यांना पत्र पाठवून या विषयात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. तसेच उरण नगरपालिका यांच्या वतीने रस्ते व गटारे यांची कामे चालू असल्यामुळे गेली ४ वर्षे एनएमएमटी बस उरण चार फाटा येथे थांबत आहे.

या सर्व बस सेवा बंद असल्याने विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, चाकरमानी व सर्व सामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. या विषयात स्थानिक वर्तमानपत्रात अनेकवेळा वृत्त प्रसिद्ध झाले आहेत. या सर्व गोष्टीची शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर हे जातीने लक्ष घालून व सतत पाठपुरावा करून हया बस सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.