Press "Enter" to skip to content

सौंदर्य सांभाळणे म्हणजे तपस्या आहे : डॉ.स्मिता नगरकर

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

गोरेगाव मुंबई येथील जेष्ठ ब्युटीशियन कवयित्री डॉक्टर स्मिता नगरकर यांनी सुतारवाडी येथे महिलांना आरोग्य सौंदर्य बाबत सखोल मार्गदर्शन केले.

यावेळी त्यांच्याबरोबर डेकाटे फार्म च्या संचालिका सौ. वैशाली डेकाटे या होत्या. त्यांनी डॉक्टर स्मिता नगरकर यांचा परिचय करून देताना सांगितले की स्मिता नगरकर यांनी शून्यातून विश्व निर्माण केले असून आज तगायत त्यांनी अनेक महिलांना आरोग्य तसेच सौंदर्याबाबत प्रशिक्षण देऊन अनेक स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा बळ दिला. डॉक्टर स्मिता नगरकर यांनी उपस्थित स्त्रियांना आरोग्य आणि सौंदर्य या बाबत मार्गदर्शन करताना सांगितले की सौंदर्य सांभाळणे म्हणजे तपस्या आहे. वयाप्रमाणे सौंदर्य फुलते. इतरांबद्दल आपण चांगले विचार करणे आवश्यक आहे. काही महिला आयुष्यभर मानसिक तणावात असतात.

आपण स्वतःवर प्रेम करा आणि जीवनावर प्रेम करायला शिका आपण चांगले स्वप्न पाहिले की आपली प्रगती होते. सर्व गरजा भागविण्यासाठी स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी पैशाची गरज असते. प्रत्येक स्त्रीने प्रशिक्षण घेऊन स्वतःचे ब्युटी पार्लर सुरू करणे आवश्यक असून सावित्रीबाई फुले यांनी असे शिकविले नाही की चूल आणि मूल सांभाळणे स्त्रियांनी अनेक क्षेत्रात प्रगती करणे आवश्यक आहे. उतरते वय झाले की सौंदर्य कमी व्हायला लागते. आपण लवकर म्हातारे दिसायला लागतो.

यशस्वी होण्यासाठी कधीही दुसऱ्याविषयी वाईट चिंतू नये. इतरांचा द्वेष करू नये. अपयशाला भिऊ नका सतत प्रयत्न करणे दुसऱ्यावर विसंबून न राहता आपण स्वतःसाठी जगणे आवश्यक आहे. आपण कृतीशी वचनबद्ध राहणे अत्यंत आवश्यक आहे. संधीची कधीही वाट पाहू नये संधी स्वतः निर्माण करा. आपल्याला माणसाप्रमाणे जगायचे असून आपले जीवन आपल्या हातात आहे. आयुष्यात दुःख करून घेऊ नका. वाद आणि चर्चा यामध्ये मोठा फरक आहे. सर्वात मोठी चुक कोणती असेल तर वेळेचा दुरुपयोग करणे.

आपला सर्वात विश्वासू मित्र म्हणजे आपला हात व कला. भाग्यशाली व्यक्ती कोणाला म्हणायचे तर जो कामात मग्न असतो असे सांगून डॉक्टर स्मिता नगरकर यांनी सांगितले की आपल्या त्वचेचे शत्रू कोण असेल तर कोल्ड्रिंग, स्विमिंग, तेलकट व अति तिखट खाणे, चुकीचा मसाज करून घेवू नये. पार्लरमध्ये जाताना त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे की नाही हे पाहणे आवश्यक आहे. आपण लावलेला लेप आपल्या शरीराला योग्य आहे का ? याचा काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक असून लेपाचे वेगवेगळे प्रकार असून ते त्वचेला उजाळा देतात असे सांगून त्यांनी डोळ्याखालील काळी वर्तुळे , चेहऱ्यावरील मुरूम, त्वचेवरील काळे डाग, चेहऱ्यावरील सुरकुत्या, डोक्यातील कोंडा याबाबत सखोल मार्गदर्शन करून त्यांनी लिहिलेल्या आधार न फसवे अश्रू या कवितांचे वाचन केले.

फसवे अश्रू कवितेचे वाचन करत असताना उपस्थित स्त्रिया भावूक झाल्या त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. शेवटी अंजली मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.