सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।
कर्जत महिला मंडळाचे विद्या विकास मंदिर शाळेसमोरील आणि रस्त्याच्या रुंदीकरणास अडथळा ठरणारा ट्रान्सफॉर्मर अखेर दुसऱ्या जागेत हलविण्यात आला आहे.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कर्जत महिला मंडळाचे विद्या विकास मंदिर शाळा आहे, शाळेच्या सरंक्षण भीतीला लागून रस्ताच्या लगत पूर्वी ट्रान्सफॉर्मर बसविला होता. शाळेसमोर असलेला ट्रान्सफॉर्मर हलवावा अशी मागणी शाळा व्यवस्थापन, पालक करत होते.
नगरपरिषद हद्दीत बहुतांश रस्ते रुंदीकरण झाले आहे, स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब राऊत चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पर्यत रस्ता काही ठिकाणी रुंद झाला आहे, मात्र या रस्त्याच्या रुंदीकरणास अडथळा ठरणारा ट्रान्सफॉर्मर हलविण्यात यावा अशी मागणी शाळा आणि या परिसरातील नागरिक नेहमीच करत होते, अखेर हा ट्रान्सफॉर्मर दुसऱ्या जागेत हलविण्यात आला आहे.
सुवर्णा जोशी नगरसेविका असताना त्यांनी महावितरण कार्यालयाशी अनेक वेळा पत्रव्यवहार केला होता.आता सुवर्णा जोशी नगराध्यक्ष पदावर आहेत, त्यांनी महावितरण अधीक्षक अभियंता पेण मंडळ आणि उपकार्यकारी अभियंता कर्जत उपविभाग यांच्याशी पत्रव्यवहार करून आणि दूरध्वनीद्वारे पाठपुरावा करून सदर कामांची तांत्रिक मंजुरी मिळवली असल्याने ट्रान्सफॉर्मर दुसऱ्या जागेत हलविण्याचे काम मार्गी लागले.








Be First to Comment