Press "Enter" to skip to content

जेएसडब्ल्यू सिमेंटतर्फे ग्राहकांना एआय समर्थित डिजिटल इंटरव्हेंशनमधून ईझ ऑफ डुईंग बिझनेसची सोय

सिटी बेल:रायगड/ डोलवी

जेएसडब्ल्यू सिमेंट या भारतातील आघाडीच्या ग्रीन सिमेंट उत्पादक आणि 12 अब्ज डॉलर्सच्या जेएसडब्ल्यू ग्रूपचा भाग असलेल्या कंपनीने आपल्या सेल्स अॅण्ड मार्केटिंग कामकाजात डिजिटायझेशन अमलात आणून एआय समर्थित डिजिटल इंटरव्हेंशनच्या माध्यमातून आपल्या माध्यम भागीदारांना ईझ ऑफ डुइंग बिझनेसची सोय उपलब्ध करून दिली आहे. यासाठी त्यांनी यलोचॅट या जगातील आघाडीच्या कन्व्हर्सेशनल कॉमर्स (संवादी व्यवसाय) सेवा प्रदाता कंपनीशी भागीदारी केली आहे. यातून त्यांच्या व्यावसायिक ग्राहकांना एआय-आधारित एनीटाईम एनीवेअर बिझनेस व्यवहार करता येणार आहेत. यलोचॅट पार्टनरशीपमुळे जेएसडब्ल्यू सिमेंटला वॉट्सअॅपसारख्या मॅसेजिंग अॅपच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा देता येतील, व्यवहार करता येतील आणि विक्री करता येईल. यामुळे आर्थिक वर्ष 2023 पर्यंत जेएसडब्ल्यू सिमेंटला सध्याच्या 14 एमटीपीए वरून 25 एमटीपीए पर्यंतचा पल्ला गाठता येणार आहे.

जेएसडब्ल्यू सिमेंटचे व्यवस्थापकीय संचालक श्री. पार्थ जिंदाल यांच्या मते, “डिजिटल तंत्रज्ञान जेएसडब्ल्यू ग्रूपच्या सर्व व्यवसायांच्या दीर्घकालीत शाश्वत प्रगती धोरणांना आकार देत आहे. भारतीय ग्राहकांना एकात्मिक गृहबांधणी पर्यार पुरवण्यात आम्ही अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहोत. आमच्या डिजिटल बदलांमुळे योग्य वेळेत डिलिव्हरी आणि सुनियोजित कार्यपद्धतींना एकूण ब्रँड अनुभवात सातत्याने होणाऱ्या सुधारणांची जोड देत आमच्या सर्व ग्राहकांना ईझ ऑफ डुइंग बिझनेसचा अनुभव मिळेल. सिमेंट उद्योगात 25 एमटीपीए ची क्षमता गाठण्याच्या उद्देशाने वाटचाल करत असताना ग्राहकांच्या सतत उत्क्रांत होणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी नाविन्यपूर्ण उत्पादनांची निर्मिती आणि ते उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही तंत्रज्ञान आणि संशोधनात गुंतवणूक होत राहील याची खातरजमा करणार आहोत. या प्रवासात यलोचॅटचे भागीदार म्हणून स्वागत करताना मला आनंद होत आहे.”

जेएसडब्ल्यू सिमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निलेश नार्वेकर म्हणाले, “आमच्या फ्रंटलाईन सेल्स टीमच्या सर्व कार्यपद्धतींमध्ये आम्ही डिजिटल इंटरव्हेंशनचा अवलंब केला आहे आणि पुढील सर्व माध्यमांमध्ये ही प्रणाली वापरात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. आमच्या सेल्स अॅण्ड मार्केटिंग कामातील या डिजिटल बदलांमुळे अधिक कार्यक्षमता आणि परिणामकारकता साधत आघाडीवर उत्तम परिणाम साधण्यात आम्हाला साह्य होणार आहे. पुरवठा साखळीत मोबाइल-टेकचा वापर केल्याने आमच्या सेल्स टीमला सर्व माहिती अगदी बोटांच्या स्पर्शावर उपलब्ध होईल. यामुळे माध्यमांची कामगिरी जोखता येईल, त्याचे विश्लेषण करता येईल आणि आमच्या ट्रेड नेटवर्कला साह्यकारी अशी निर्णयप्रक्रिया वेगवान होईल. हा प्रवास सुरू ठेवत आता आम्ही डिजिटला इंटरव्हेंशनचे हे लाभ आमच्या वितरकांनाही देत आहोत आणि त्यासाठी कन्व्हर्सेशनल कॉमर्स सेवा देण्यासाठी आम्ही व्हॉट्सअॅपचा माध्यम म्हणून वापर करत आहोत. यामुळे त्यांना कुठूनही कधीही त्यांची ऑर्डर देता येईल, कामगिरी जोखता येईल, अकाऊंट स्टेटमेंट मिळवता येतील आणि अर्थातच आपल्या व्यवसायाशी कायम जोडलेले राहता येईल.

सेल्स आणि मार्केटिंग कार्यपद्धतींमधील डिजिटायझेशनसंदर्भात जेएसडब्ल्यू सिमेंटचे मुख्य विपणन अधिकारी श्री. के. स्वामीनाथन म्हणाले, “आमच्या डिजिटल उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही क्षमता, प्रणाली, आराखडे आणि तंत्रज्ञान एकत्र आणत आमच्या ग्राहकांसोबतचा संवाद वाढवत आहोत तसेच त्यांना कमाल क्षमतेच्या वैयकतिक सेवा प्रत्यक्ष वेळेत देऊ करत त्यांचा व्यवसाय आणि पर्यायाने आमचा व्यवसाय वृद्धिंगत करण्यात हातभार लावत आहोत. आधुनिक मोबाइल आणि एआय इंटरव्हेंशनच्या माध्यमातून ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी आम्ही सेंटर ऑफ एक्सलन्सची निर्मिती करत आहोत.”

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.