सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
रस्त्यावर सापडलेल्या पाकिटात आधारकार्डांच्या आधारे तपास करुन 11 हजार रुपये प्रामाणिकपणे परत करण्याची घटना आपटा येथे घडली.
याबाबत हकिकत अशी की,आपटा येथील महेंद्र कृष्णा भोईर यांना माॅर्निंग वाॅकच्या वेळेस 11 हजार रुपये असलेले पाकिट रस्त्यात सापडले होते.या पाकिटात रोख रुपये 11 हजार आणि आधारकार्ड होते.यावेली महेंद्र भोईर यांनी आधारकार्डंचा आधार घेऊन रोख रकमेसह हरविलेले पाकिट कोणाचे?याचा शोध घेतला.शोध घेतल्यानुसार सदर पाकिट पेण तालुक्यातील दादर गावातील हापशिर आली येथे राहणाऱ्या शिवाजी नथुराम म्हात्रे यांचे असल्याची माहिती मिळाली.
रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील कंपनीतून रात्रपाळी करुन कामावरुन घरी जाताना शिवाजी म्हात्रे यांचे पाकिट हरविले होते.आपटा येथील महेंद्र भोईर यांची पाकिट मालकाबाबत खातरजमा होताच त्यांनी ते पाकिट शिवाजी म्हात्रे यांना परत केले.पाकिटातील पैसे व ओलखपत्र , एटीएम कार्ड जसेच्या तसे शिवाजी म्हात्रे यांना मिळाल्याने त्यांच्या कुटुंबियांनी महेंद्र भोईरचे आभार मानले.त्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वंत्र कौतुक होत आहे.








Be First to Comment