सिटी बेल लाइव्ह । अनिल घरत । उरण ।
असं म्हणतात … सोशल मीडिया….कुणासाठी वाईट अनुभव देणारं माध्यमं… ठरतं… तर, कुणासाठी… प्रेरणादायी आदर्श निर्माण करणारं साधनं…ठरतं!…असचं ह्या माध्यमांद्वारे म्हणजे … व्हाट्स ऍप आणि फेसबुक वर प्रसारित होणाऱ्या सामाजिक कार्यांच्या अनेक पोस्ट पाहून एक युवक अंतर्मनातून प्रेरित होऊन आपल्या स्वभावातील त्या दानशूर पणाची कवाडं उघडतं आणि आपल्या दातृत्वाची मिसाल कायम करतो असं प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळालं ते … मूळचे पिरकोन- उरण …गावचे रहिवाशी असणारे …पण … कायमच .. मुंबई ( वडाला ) येथे वास्तव्यास असणारे … श्री उमेश जी गावंड…. हे युवा नवंतरुण ज्यांनी सारडे विकास मंच ह्या सामाजिक संस्थेच्या …कला,क्रीडा,शैक्षणिकआणि सांस्कृतिक कार्यांच्या अनेक… पोस्ट… ह्या… व्हाट्स ऍप आणि फेसबुकवर पाहून एकंदरीत त्यांच्या स्वभावातील ते समाज्याप्रति जान असणारं …आणि सामाजिक भान असणारं… किरदाराने… त्यांना शांत बसूच दिलं नाही .. आणि त्यांच्या स्वभावातील तो भला माणूस मदती करता पुढे सरसावला !…आणि लगेचच त्यांनी मुंबईवरून सारडे विकास मंचचे अध्यक्ष … श्री नागेंद्र जी म्हात्रे यांच्याशी संपर्क करून …कोरोना ( कोविड १९ ) ह्या महाभयंकर महामारीच्या काळात जनतेचं आणि खास करून शालेय विद्यार्थी बांधवांचे ह्या रोगापासून संरक्षण व्हावं म्हणून … आपल्या मनातील मदतीचा मानस जाहीर केला…आणि ती मदत होती… …हिमालया … या सारख्या… एका नामांकित कंपनीच्या १०० मि.ली.च्या…सॅनिटायजर च्यां १०० (शंभर ) बॉटल्सचं ५०० मि ली च्या 20 बॉटल… आणि त्या बॉटल्स लगेचच..ते स्वतः मुंबईहून …सारडे येथे घेऊन पोहचले ..ते…. श्री उमेश जी गावंड…..आणि त्या दिलेल्या मदतीचं वाटप योग्य त्या गरजूवंतां पर्यंत व्हावं म्हणून ..जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घेत…. सारडे विकास मंच ह्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून … रा.जि.प.शाळा सारडे, …पुनाडे आदिवासी शाळा …आणि … चिरनेर अक्कादेवी आदिवासी शाळा ह्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांच्यां आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी या सॅनिटायजर बॉटल्स चे वाटप करण्यात आलं.
ह्या समाजपयोगी कार्याकरीता ज्यांनी मदतीचा हात पुढे केला त्या… श्री उमेश जी गावंड …यांच्या औदार्यातून आणि सारडे विकास मंचच्यां माध्यमातून साकार झालेल्या…सोहळ्यातुन … सारडे प्राथमिक शाळा, …पुनाडे आदिवासी शाळा,…आणि… अक्कादेवी आदिवासी शाळा चिरनेर ….ह्या शाळेतील विद्यार्थ्यांना सॅनिटायजरचं वाटप करण्यात आलं. …ह्या कार्यक्रमा दरम्यान …चिरनेर वाडीचे शिक्षक … श्री सन्नी जी बोरसे सरांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं कीं… सारडे विकास मंच ह्या संस्थेच्या माध्यमातून वेळोवेळी ह्या वाडीवस्ती वरच्या आदिवासी विद्यार्थी बांधवांना मदतीचा हात हा मिळतचं असतो ,आणि ह्या मुलांच्या काही छोट्या- मोठ्या गरजा असतील तर आम्हीं देखील निसंकोच पणे अगदी हक्काने त्यांच्या कडे मागणी करत असतो आणि ते ती मागणी मदत रूपानं पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न देखील करत असतात !… सोबतच ज्यांच्या दातृवानं हा कार्यक्रम साकार झाला ते सध्या…. मुंबई येथे वास्तव्यास असणारे श्री उमेश जी गावंड यांना काही महत्वाच्या कामा निमित्ताने ह्या कार्यक्रमास उपस्थित राहता न आल्याने त्यांनी सर्वांची दिलगिरी व्यक्त करून एका चांगल्या कार्यक्रमास मुकल्याची खंत देखील व्यक्त केली ….अश्या ह्या प्रेरणादायी आणि अनोख्या कार्यक्रमास उपस्थित होते ते … रा.जि.शाळा सारडेचे… उपक्रमशील आदर्श शिक्षक …श्रीमंत कौशिक जी ठाकूर सर, …मुख्याध्यापिका सौ.उर्मिला म्हात्रे मॅडम, सौ.समृद्धी वऱ्हाडी मॅडम,…श्री सुनिल जी नऱ्हे सर, …पुनाडे आदिवासीवाडी शाळेचे शिक्षक…श्री सुनिल जी भोपळे सर,…चिरनेर अक्कादेवी आदिवासीवाडी शाळेचे शिक्षक ..श्री सन्नी बोरसे सर, …सारडे विकास मंच चे ..अध्यक्ष.. श्री नागेंद्र जी म्हात्रे, … उपाध्यक्ष…श्री रोशन जी पाटील, .. श्री रोहित जी पाटील,…गोल्डन ज्युबली मित्र मंडळाचे… श्री अनिल जी घरत ,श्री नवनीत जी पाटील आणि शालेय विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांच्या उपस्थितीत हा अनोखा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.












Be First to Comment