सरचिटणीसपदी राजेंद्र खाडे
सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
कै. अशोकशेट लोखंडे कुणबी भवन माणगाव येथे माणगाव तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समितीची तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली. यावेळी सर्वानुमते अध्यक्षपदी श्री अरुण चाळके तर सरचिटणीसपदी श्री राजेंद्र खाडे यांची निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदी श्री. दुर्वास म्हाशेलकर, श्री. सुरेंद्र पालांडे, श्री. रामभाऊ टेंबे, श्री. रामचंद्र मेस्त्री तर सहचिटणीसपदी श्री. राजाराम जांभळे, श्री. रुपेश पितळे, श्री. मेघनाथ सातपुते, श्री. सुनील पवार यांची निवड करण्यात आली. खजिनदार पदी श्री. अजित तार्लेकर तर सदस्यपदी श्री. अनिल नवगने, श्री. रमेश मोरे, श्री. मधुकर नाडकर, श्री. विलास म्हसकर, श्री. शांताराम भोरावकर, श्री. भागोजी डवले, श्री. चंद्रकांत यादव, श्री. विलास यादव, श्री. चंद्रकांत धोकटे, श्री. शांताराम मेकडे, श्री. संदेश कळंबे, श्री. मंगेश मेस्त्री, श्री. शशिकांत म्हात्रे, श्री. महेश तलोजेकर, श्री, दशरथ नांदविकर, श्री. शशिकांत मोहिते, श्री. प्रसाद देवळेकर, श्री. उदय म्हशेलकर, श्री. विनायक सापळे यांची निवड करण्यात आली. सल्लागार म्हणून श्री महादेव बक्कम, श्री बाळाराम नवगणे, श्री. नथुराम करकरे, श्री. बापूसाहेब सोनगिरे यांची निवड करण्यात आली तर रायगड जिल्हा कार्यकारिणीसाठी रायगड जिल्हा ओबीसी समन्वयक श्री. उदय कठे, श्री. ज्ञानदेव पवार, श्री. सुभाष भोनकर, श्री. संजय ढवळे, श्री. सुदाम शिंदे, सौ. भारती जाधव यांची निवड करण्यात आली.
यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी श्री उदय कठे यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आपली लढाई कुठल्या समाजाविरुद्ध किंवा पक्षाविरुद्ध नसून आपली लढाई आपल्या न्यायहक्कासाठी आहे. सन १९३१ साली आपली जनगणना केली तेंव्हा आपण ५२% होतो. १९३१ नंतर आजतागयत अनेक समजाचा ओबीसीमध्ये समावेश केलेला आहे. आज आपली प्रमुख मागणी आहे ती ओबीसींची जातनिहाय जनगणना करा. आणि यासाठी आपण सर्वप्रथम संघटित होऊ या. यावेळी श्री. अरुण चाळके, श्री. महादेव बक्कम, श्री. राजेंद्र खाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले








Be First to Comment