Press "Enter" to skip to content

चिंचवली तर्फे दिवाळी ग्रामपंचायत सरपंचपदी सौ दर्शना पवार यांची हट्रिक

उपसरपंचपदी राहुल शिंदे

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

रोहा तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ग्रा.पं.निवडणुकीत बहुमताने सत्ता प्रस्थापित केलेल्या ग्रु.ग्रा.पंचायत चिंचवली तर्फे दिवाळी ग्रा.पंचायतीच्या आज झालेल्या सरपंच व उपसरपंच पदाचे निवडणुकीत सरपंचपदी हट्रिक मारत आंबेवाडी जिल्हा परिषद मतदारसंघातील राजीप चे सदस्य दयाराम पवार यांच्या सौभायवती सौ दर्शनाताई पवार यांची तर उपसरपंचपदी राहुल शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

कोकणचे भाग्यविधाते तथा रायगडचे खा.सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून तसेच माजी रोहा पं सं सभापती मोतीराम तेलंगे व राजीप सदस्य दयाराम पवार यांच्या अथक प्रयत्नाने चिंचवली तर्फे दिवाळी ग्राम पंचायत मध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे मार्गी लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच आपल्या ग्रा.पंचायतीचा सर्वांगिक विकास करू शकतो हा सुज्ञ मतदारांचा ठाम विश्वास असल्याने मतदारांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुनश्च सत्तेची सात पैकी सात उमेद्वार बहुसंख्ये मताधिक्य देत पुन्हा संधी दिल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने या ग्रा.पंचायतीवर आपले निर्विवादपणे वर्चस्व प्रस्थापित करून येथील सात पैकी सात सदस्य बहुसंख्ये मताधिक्याने निवडून आणले .

१० फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या सरपंचपदासाठीच्या सोडतीत सर्वसाधारण आरक्षण अनुसूचित जाती जमाती महिला असल्याने या ठिकाणी पुन्हा हट्रिक मारत सरपंच पदासाठी सौ दर्शनाताई पवार या ठिकाणी सरपंच म्हणून विराजमान होत उपसरपंचपदी राहुल शिंदे यांची बिनविरोध निवड करत सर्व ग्रामस्थ तसेच नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्य नागरिकांनी एकत्रितपणे येत सर्वांगिक गावच्या विकासासाठी विचार करत सदस्यांची संख्याही मोठी असल्याने पहिल्या सरपंच पदाचा बहुमान तसेच पक्षश्रेष्ठींचे योग्य मार्गदर्शन घेत या ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादीचा पुन्हा झेंडा फडकवला यावेळी उपस्थित आ अनिकेत तटकरे राजीप सदस्य दयाराम पवार माजी रोहा पं सं सभापती व जेष्ठ नेते मोतीरामशेठ तेलंगे नवनिर्वाचित सदस्य मिनल मांडवकर,सानिका येरुणकर,मंगेश पवार ललिता मोरे,नंदिनी धनवी, तसेच हेटवणे चिंचवली आदिवासी व बौद्ध वाडीतील ग्रामस्थ महिला व युवा कार्यकर्ते उपस्थित नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा देत प्रसंगी यावेळी कोकणचे आमदार अनिकेतभाई तटकरे यांचे देखील ग्राम पंचायत व सर्व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.