बारवई सरपंचपदी नियती बाबरे तर उपसरपंचपदी ललिता पडवल बिनविरोध
सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
बारवई ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या अॅड.नियती निलेश बाबरे व उपसरपंच पदी ललीता वामन पडवळ यांची बिनविरोध निवड झाल्याने शिवसेनेत चैतन्य निर्माण झाले आहे.
बारवई ही ग्राम पंचायत याअगोदर शिवसेना सोडून इतर पक्षाकडे असायची.परंतु नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सात पैकी महाआघाडीच्या सहा जागा तर बीजेपी-मनसे युतीची एक जागा निवडून आली. यात शिवसेनेकडून सरपंच पदासाठी अॅड.नियती निलेश बाबरे तर उपसरपंच पदासाठी ललिता वामन पडवल यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणुक निर्णय अधिकारी यांनी सरपंच व उपसरपंच यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

बारवई ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदी अॅड.नियती निलेश बाबरे तर उपसरपंचपदी ललिता वामन पडवल यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.यावेली नवनिर्वाचित सरपंच अॅड.नियती निलेश बाबरे, उपसरपंच ललिता वामन पडवल, सदस्य म्हणून प्रतिक्षा दिपक तारे,उषा किसन वाघमारे,अमीर सिताराम वाघमारे,रुपाली सुशील मुंढे,किर्तीं समीर दलवी उपस्थित होते.नवनिर्वाचित सरपंच अॅड.नियती निलेश बाबरे यांनी लगादार तिस-यांदा बारवई ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून येण्याची हॅट्ट्रिक साधली आहे.

बारवई ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फड़कल्याने माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहर भोईर , तालुका प्रमुख रघुनाथ पाटील,परेश पाटील, सुधीर पाटील,पोयंजे पंचायत समिती विभागप्रमुख नितिन पाटील, पंचायत समिती उपविभाग प्रमुख किशोर पाटील यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी निलेश बाबरे,वामन पडवल,नरेश पडवल, राजेश पडवल, अरुण पाटील, प्रकाश बाबरे,अनंत खंडागळे, नंदकुमार गोजे,हेमंत गोजे,भाऊ पाटील, आत्माराम पाटील, मनोहर पाटील, दत्तात्रेय कातकरी, अशोक कातकरी,गणू गोजे, संतोष कातकरी,संजय खंडागळे,दिपक तारे, प्रकाश पडवल, पांडूरंग पडवल, सचिन पडवल, संतोष गोजे,खंडू गोते, प्रशांत गोजे,महेश लाड, जयवंत शिंदे आदी उपस्थित होते.








Be First to Comment