सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।
कोंडगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. कमल अरविंद बुरुमकर व उपसरपंचपदी शेकापचे जेष्ठ नेते अनंत आत्माराम वाघ यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर राजिपच्या अर्थ व बांधकाम सभापती अॅड. निलीमाताई धैर्यशील पाटील यांनी कोंडगाव ग्रामपंचायत कार्यालयात येऊन सरपंच – उपसरपंचांचे अभिनंदन केले.
यावेळी माजी सरपंच व विद्यमान सदस्य निखील मढवी, यशवंत शिद, रोहिणी शिद आणि कोंडगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य प्रणाली म्हात्रे, यशवंत शिद, रोहिणी शिद, विठ्ठल वाघमारे, प्रमिला खंडवी, जयंती भस्मा, सोनल वाघ, नितीनशेठ राजिवले, सदानंद शिंदे, मधुकर मालुसरे, दशरथ बुरुमकर, खुमा हंबीर, एकनाथ राजिवले, काशिनाथ बुरुमकर, ज्ञानदेव मालुसरे, शांताराम बुरुमकर, नामदेव शिंदे, वसंत बुरूमकर, डाकी, पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.








Be First to Comment