सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
नुकत्याच झालेल्या ग्रा.पं.निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या व पुर्णपणे बहुमताने सत्ता प्रस्थापित केलेल्या ग्रु.ग्रा.पंचायत खांब ग्रा.पंचायतीच्या आज झालेल्या सरपंच व उपसरपंच पदाचे निवडणुकीत सरपंचपदी रंजना योगेश टवळे यांची तर उपसरपंचपदी मनोज अनंत शिर्के यांची निवड करण्यात आली आहे.
रायगडचे खा.सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून या ग्रा.पंचायतीचे विकासकामांसाठी नेहमीच झुकते माप मिळाल्याने व मोठ्या प्रमाणावर विकासकामे मार्गी लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच आपल्या ग्रा.पंचायतीचा विकास करू शकतो हा सुज्ञ मतदारांचा ठाम विश्वास असल्याने मतदारांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुनश्च सत्तेची संधी दिल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने या ग्रा.पंचायतीवर आपले निर्विवादपणे वर्चस्व प्रस्थापित केले.
स
रपंचपदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण असल्याने सरपंच पदासाठी इच्छूक सदस्यांची संख्याही मोठी असल्याने पहिल्या सरपंच पदाचा बहुमान कोणाला मिळतोय याकडे सा-यांचेच लक्ष लागले असतानाच पक्षश्रेष्ठींनी योग्य निर्णय घेऊन पहिला सरपंचपदाचा मान रंजना टवळे यांना दिल्याने शेवटी त्यांची सरपंचपदासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.या निर्णय प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यलमार यांनी काम पाहिले.

यावेळी जेष्ठ नेते रामचंद्र चितळकर, प्रकाश थिटे,आंबेवाडी सरपंच सुरेश महाबळे,उपसरपंच श्रीकांत चव्हाण, माजी सरपंच प्रदीप चोरगे,माजी उपसरपंच संतोष टवळे,जनार्दन महाबळे,नारायण लाडगे,नथूराम जाधव, सदानंद जाधव,सुशील जाधव, केशव मोहिते, काशिनाथ चोरगे,काशिनाथ वातेरे,महादेव सानप,पुरणमल मोदी, शंकर मोदी आदी प्रमुख कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रा.पं.हद्दीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.
आपल्या सरपंचपदाच्या निवडीबद्दल आपली ग्रा.पंचायतीचे सरपंच पदासाठी नियुक्ती करून पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ करून दाखविन व ग्रा.पं.हद्दीत जास्तीत जास्त विकासकामे कशी करता येतील याकडे आम्ही सर्वजण शंभर टक्के प्रयत्न करू अशाप्रकारे नवनिर्वाचित सरपंच रंजना टवळे यांनी आपल्या निवडीनंतर पत्रकारांना प्रतिक्रिया दिली आहे.








Be First to Comment