Press "Enter" to skip to content

वावेपोटगे ग्रामपंचायतीवर सेनेचा भगवा

सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।

रोहा तालुक्यातील अलिबाग विधानसभा मतदारसंघातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या वावेपोटगे ग्रामपंचायतीची सरपंच, उपसरपंच पदाकरिता निवडणूक घेण्यात आली. सरपंच पदाकरिता शारदा मुकेश गिजे यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी वावेपोटगे सरपंचपदी शिवसेना पुरस्कृत शारदा मुकेश गिजे यांची बिनविरोध झाल्याचे घोषित केले. तर उपसरपंचपदी स्वप्निल ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सदर ग्रामपंचायततीवर गेली 20 वर्ष सत्ता होती, आमदार महेंद्र दळवी जि.प सदस्या मानसी ताई दळवी तालुकाप्रमुख समीर शेडगे, माजी तालुकाप्रमुख ऍड. मनोजकुमार शिंदे यांच्या आशिर्वादाने पहिल्याच निवडणुकीत सेनेने, बाजी मारून शेकापची सत्ता संपुष्टात आली आहे.

या निवडणूकीचे किंगमेकर, मोतीरात गिजे यांनी, निवडणूकीची रणनीती आखत सर्वाधिक सदस्य शिवसेना पुरस्कृत निवडून आणण्यात यश प्राप्त केले आहे. या सभेला निवडणूक निर्णय अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच शारदा गिजे, उपसरपंच स्वप्निल ठाकूर, अनिता ठाकूर, सतिश मोरे यासदस्यांसह तलाठी सांभरे ग्रामसेविका उपस्थित होते.

सरपंच शारदा गिजे, उपसरपंच स्वप्निल ठाकूर यांचे अभिनंदन आमदार महेंद्र दळवी, तालुकाप्रमुख समीर शेडगे, मानसी दळवी, मोतीराम गिजे, ऍड मनोजकुमार शिंदे यांच्यासह मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. नवनिर्वाचित सरपंच शारदा गिजे यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतमध्ये विकास कामे सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन तसेच पक्षभेद, मतभेद बाजूला ठेवून सर्वांगीण विकास साधणार असल्याचे सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.