सिटी बेल लाइव्ह । माथेरान । मुकुंद रांजाणे ।
माथेरान पर्यटन नगरीमध्ये सध्या होत असलेल्या अनियमित पाणी पुरवठ्यावर माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी जलप्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांबरोबर नगरपालिका दालनात चर्चा करून नागरिकांना भेडसावत असलेल्या पाणी टंचाईबद्दल खडसावताना पाणी पुरवठा सुरळीत व्हावा ह्याकरता तंबी दिली .
मागील अनेक दिवसांपासून माथेरान कर असुरळीत पाणी पुरवठ्यामुळे हैराण आहेत आता सध्या मंदीचा काळ असतानाही पाणी पुरवठा अनियमित होत आहे माथेरान ला पिण्यासाठी येथील शारलेट लेक येथून पाणी पुरवठा होत होता तसेच सुधारित पाणी पुरवठा योजने अंतर्गत नेरळ येथून जलवाहिनी द्वारे माथेरान करिता पाणी पुरवठा होत आहे पण ही व्यवस्था वारंवार बिघडत असल्याने त्याचा सर्व भार माथेरानमधील शारलेट लेक च्या पाणी पातळीवर होत आहे नेरळ लाईन बंद झाल्यानंतर माथेरानच्या शारलेट लेक चा भरमसाठ उपसा झाल्यामुळे तलावाच्या पाण्याची पातळी खालावली आहे हा माथेरान च्या पर्यटनासाठी चिंतेचा विषय आहे.
शारलेट लेकचे पाणी माथेरानच्या मे महिन्यातील पर्यटन हंगामामध्ये माथेरान करिता नेहमीच वरदान ठरलेले आहे त्यामुळेच माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी जलप्राधिकारणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या दालनात बोलावून विशेष बैठकीचे आयोजन केले होते त्यामध्ये माथेरान करिता मे महिन्याच्या काळामध्ये अखंडित पाणी पुरवठा कसा होईल ह्यावर भर देण्यात आला.
माथेरानचे शिवसेना गटनेते प्रसाद सावंत यांनीं ह्यावेळी जल प्राधिकरणाच्या चुका दाखवून त्याकडे त्वरित लक्ष देण्यास सांगितले नेरळ माथेरान दरम्यान 22 ठिकाणी लिकेज असल्याने माथेरानमध्ये पाणी कमी दाबाने उत्सर्जित होत आहे त्या लिकेजेस ताबडतोब काढण्यास ह्यावेळी त्यांनी सांगितले तर ह्याच लाईनवर अनेकांना थेट पाणी जोडण्या देण्यात आल्यात त्याचाही फटका माथेरानच्या पाणी पुरवठ्यावर होत आहे ह्याकडेही अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले व त्यावर लवकरच करावाई करू असे अधिकाऱ्यांनी सांगितले .
माथेरानचे पर्यटन सर्वस्वी पाण्यावर अवलंबून असल्याने हा प्रश्न लवकर निकाली काढावा असे ह्यावेळी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत ह्यांनी सांगितले जुमापट्टी व वॉटर पाईप येथील पंपिंग स्टेशन मध्ये राखीव पंप उपलब्द करून माथेरांकरांना अखंडित पाणी पुरवठा व्हायलाच हवा असे ह्यावेळी त्यांनी सांगितले तर माथेरान ला पाणी पुरवठा करणारा शारलेट लेक ला गळती लागली असून मोठी दुर्घटना होण्याअगोदर ह्या तलावाची दुरुस्ती व्हावी असे ही त्यांनी सांगितले शारलेट लेक ची घातलेली पातळी भरून काढण्यासाठी दर बुधवारी माथेरानला होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असून मे महिन्यातील पर्यटन हंगामामध्ये माथेरान ला मुबलक पाणी पुरवठा केला जाईल व त्याचे नियोजन आतापासूनच सुरू केल्याचे जलप्राधिकारण अभियंता प्रवीण बिर्ला ह्यांनी ह्यावेळी सांगितले.
माथेरानचा पाणी पुरवठा नियमित राहावा ह्या करिता सर्वतोपरी सहाय्य करू असे ह्यावेळी मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांनी सांगितले ह्या बैठकीस माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, गटनेते प्रसाद सावंत जलप्राधिकरणाचे पनवेल येथील अभियंते विजय सूर्यवंशी माथेरानचे तांत्रिक उपअभियंता भोसले शाखाधिकारी प्रवीण बिर्ला नगरसेवक नरेश काळे, शकील पटेल, राजेंद्र शिंदे माथेरान मनसे शहराध्यक्ष संतोष कदम उपस्थित होते.








Be First to Comment