भेंडखळ चे बीपीसीएल प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरणार
सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे ।
उरण तालुक्यातील भेंडखळ गावातील भारत पेट्रोलियम(BPCL)च्या उर्वरीत प्रकल्पग्रस्तांना कामावर(नोकरीत ) सामावून घेण्याबाबतचे पत्र दि.6 फेब्रुवारी 2021 रोजी भारत पेट्रोलियम प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती,भेंडखळच्या वतीने भेंडखळ येथे असलेल्या BPCL कंपनी प्रशासनाला देण्यात आले आहे.हे पत्र देण्यापुर्वी भारत पेट्रोलियम व्यवस्थापन व प्रकल्पग्रस्त तसेच भेंडखळ चे सरपंच ,सदस्य यांच्याबरोबर झालेली चर्चा देखील करण्यात आली आहे.
यापुर्वी अनेक आंदोलने झाली.माननीय शरद पवार हे मुख्यमंत्री असताना त्यांनी BPCL कंपनी प्रकल्पग्रस्तांच्या रोजगारबाबतची सकारात्मक भूमिका घेतली होती. या सर्वांचा विचार करून इतर बेरोजगार प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घ्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा BPCL कंपनी प्रशासनाला एका निवेदनाद्वारे प्रकल्पग्रस्त संघर्ष समिति चे अध्यक्ष अनिल अशोक ठाकुर यांनी दिला आहे.
भारत पेट्रोलियम प्रकल्पात नव्याने नोकरभारती करता येणार नाही असे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे मात्र केंद्र सरकारच्या नविन आदेशानुसार फिक्स टर्म रेक्रुइट्मेंट म्हणून प्रकल्पग्रस्तांना घेण्यात कोणतीही हरकत नसावी असे प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे.यामुळे व्यवस्थापनास नविन कामगार मिळतील व सध्या होत असलेल्या खर्चापेक्षा खर्च देखील कमी होईल.मात्र व्यवस्थापन कोणत्याही प्रकारची सकारात्मक भूमिका घेत नसल्याने प्रकल्पग्रस्त संघर्ष समिति आता आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत असून नुकतीच त्यांची एक बैठक पार पडली व त्यामधे पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात आल्याचे व न्याय न मिळाल्यास प्रकल्पग्रस्त लवकरच रस्त्यावर उतरतील असे प्रकल्पग्रस्त संघर्ष समिति चे अध्यक्ष अनिल अशोक ठाकुर यांनी सांगितले.यावेळी उपाध्यक्ष लिलेश्वर भगत ,सेक्रेटरी अक्षय भोईर ,सह सेक्रेटरी रोहिदास घरत ,खजिनदार शक्ति पाटिल , कमलाकर मोकल,कैलास भोईर,सचिन पाटील,मेघनाथ भगत,महेंद्र घरत,ध्रुवा ठाकूर व इतर सर्व सदस्य उपस्थित होते.








Be First to Comment