जुनी पोसरी आणि कष्टकरी नगर यांच्या रेल्वे क्रॉसिंग भुयारी मार्गांच्या कामाला गती
सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
रसायनी रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे गेट असल्याने आणि रेल्वे मार्ग दुहेरी असल्यामुळे येणाऱ्या गाड्यांची संख्या जास्त आहे त्यामुळे मोहोपाडा बाजारपेठेत जाण्यासाठी किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांना वाहनधारकांना गेट बंद असल्यामुळे अनेक वेळा आपला वेळ वाया घालवावा लागत आहे. त्यामुळे रेल्वेने रेल्वेने सर्व गेटच्या ठिकाणी भुयारी क्रॉसिंगचा अवलंब केला आहे त्यामुळे वाहनधारकांचा भरपूर वेळ वाचणार आहे.
सदरचे काम रसायनी रेल्वे स्टेशन जवळ दोन वर्षापासून सुरू आहे परंतु काम संथगतीने सुरू असल्याने अद्याप ते काम पूर्ण होऊ शकले नाही. परंतु आता रेल्वे अधिकाऱ्यांशी बोलणे झाले असता असे समजले की येत्या एक ते दोन महिन्यांमध्ये क्रॉसिंग पूर्ण होऊन ते वाहनधारकांना प्रवाशांना सुरु होईल असे रेल्वे अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले आहे.

तसेच पावसाळ्यामध्ये जर पाणी तुंबला तर तेथे पाणी उपसण्यासाठी पंप बसवले जाणार असल्याचे समजले तसेच पुलाखाली स्ट्रीट लाईट लावले जाणार आहे त्यामुळे या पुलाखालून सुरक्षित प्रवास होईल यात शंका नाही.








Be First to Comment