सावळ्याची माया
नयनांच्या डोहात तुझ्या
नेत्र माझे आकंठ बुडाले
येता तू बाहुपाशात माझ्या
अतरंगी मी मोहरले
बाधा निळ्या जादूची होता
मी न आता माझी उरले
गीतात माझ्या फक्त आता
पाव्याचे मधूस्वर हे जडले
कालिंदीच्या निळ्या जलासम
मी तुझ्या निळाईत मिसळले
मी न माझी आता तुझ्यासम
डोळ्यांना हे क्षणात कळले
अंतरंगात तुझे प्रतिबिंब
कायमचे हे शिल्प कोरले
सरिता थबकली पाहण्या बिंब
तुझ्या प्रीतीचे मुखी साकारले
घेई हात हाती तुझ्या
भवसागर हा तरला आनंदे
सावळ्याची माया माझ्या
मोरपीस मुकुटी डोले स्वछन्दे
दिपाली जोशी, नवीन पनवेल






Be First to Comment