Press "Enter" to skip to content

गोवे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा

महेंद्र पोटफोडे सरपंचपदी तर उपसरपंचपदी नितीन जाधव बिनविरोध विराजमान

सिटी बेल लाइव्ह । गोवे कोलाड । विश्वास निकम ।

रोहा तालुक्यातील १५ जानेवारी रोजी संपन्न झालेल्या गोवे ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाची निवडणुक १० फेब्रुवारी रोजी ग्राम पंचायत कार्यालय गोवे येथे सार्वत्रिक निवडणूक अधिकारी गुंड यांच्या अधिकारीखाली संपन्न झाली असून या ग्राम पंचायतीवर सरपंचपदी महेंद्रशेठ पोटफोडे तर उपसरपंचपदी नितीन जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

मोठ्या उत्साह वातावरणात संपन्न झालेल्या सरपंच निवड प्रसंगी प्रमुख उपस्थितीत आ अनिकेतभाई तटकरे, मा रामशेठ कापसे, संदेश कापसे, जेष्ठ नेते तानाजी जाधव,विलास पवार,श्रीकांत चव्हाण राकेश शिंदे संजय माडलूस्कर,प्रवीण पवार,नंदा कापसे,मंगेश पोटफोडे, नरेंद्र जाधव, संदीप जाधव, राजेंद्र जाधव, भाई पोटफोडे नथु शिंदे,लहू पिंपळकर, अजय कापसे,राकेश कापसे,सुरेश जंगम,नरेंद्र माळी,किशोर जाधव, शांताराम पवार नितीन जवके,रामचंद्र पवार राजेश शिर्के, कमलाकर शिर्के, बळीराम जाधव,भरत जाधव, किरण पवार,पांडुरंग जाधव सुभाष वाफिकर, सुरेश जाधव, रामभाऊ जाधव,आदी उपस्थित होते तसेच नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्य नरेंद्र पवार सुप्रिया जाधव रंजिता जाधव अंजली पिंपळकर सुमित गायकवाड भावना कापसे निशा जवके निवडणूक अधिकारी अधिकारी गुंड तलाठी हिंदोळे ग्राम सेवक शिद कर्मचारी मयुरी जाधव रामचंद्र कापसे आदी गोवे शिरवली मुठवली ग्रामस्थ महिला युवक व युवती बहुसंख्येने उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा व सदिच्छा दिल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.