Press "Enter" to skip to content

आपटा ग्रुप ग्रामपंचायतवर महाविकास आघाडी चा झेंडा फडकला

सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।

अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या ग्रुप ग्राम पंचायत आपटा सरपंचपदी शेकाप च्या सौ.निकिता दर्शन भोईर व उपसरपंच पदी शिवसेनेचे वृषभ वामन धुमाळ विराजमान झाले .

विकासाच्या मुद्द्यावर लढलेल्या महाविकास आघाडीचे १३ पैकी ११ सदस्य निवडून आले होते. आज दिनांक १०/०२/२०२१ रोजी सकाळी १० .०० वाजता नामनिर्देशन पत्र भरण्यात आले होते. विरोधकांकडे संख्या बळ नसल्याने विरोधात नामनिर्देशन पत्र भरलेच गेले नसल्याने सरपंच पद व उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणूक अधिकारी जोगी व ग्रामविकास अधिकारी शेंडगे यांनी निवडीची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर महाविकास आघाडी च्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व ब्रास बँड वाजवत जल्लोषात मिरवणूक काढली व विजय साजरा केला .

ह्यावेळी उपस्थित नवनिर्वाचित सदस्य मारुती अशोक चव्हाण , नाजनिन खलिल पटेल , संगीता लक्ष्मण बावधाने , गीता राजू देशमुख , वंदना शरद वाघे , असद पिठ्ठू , मयुर शेलार , दामू माडे , पांडुरंग लेंडे , शिवसेना तालुका प्रमुख रघुनाथ पाटील , विभाग प्रमुख भरत घरत ,शेकाप विभाग चिटणीस संतोष पाटील , केलवणे युवासेना जिल्हा परिषद अधिकारी स्वप्नील भोवड , उपतालुका प्रमुख अशोक थोरवे , शाखा प्रमुख राजेंद्र घोलप ,उप शाखा प्रमुख संजय आंबवणे ,गणेश सावंत , दत्ता पाटील , पांडुरंग भोईर , मधुकर भोईर ,गोपाळ सावंत , विजय बाटे ,शशी येडेकर ,गोविंद किलंजे , रमेश आंग्रे , अशोक सकपाळ , आत्माराम मेहतर , हरेश ओझा ,सखाराम पाटील ,ओमकार पवार ,सुनील पवार , सुमित धुमाळ , सिद्ध राज मेहेतर , शाम अंबवणे, काशिनाथ सावंत , सागर भोवड , विनायक मेहतर , अक्षय मेहतर ,केतन मेहतर ,रुपेश राठोड आदी शिवसेना व शेकाप चे कार्यकर्ते उपस्थित होते .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.