Press "Enter" to skip to content

ज्येष्ठांच्या सेवेसी तत्पर,आंग्रे रामेश्वर

सिटी बेल लाईव्ह/ पनवेल.

     करंजाडे ग्राम पंचायतीचे सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना पंढरपूर सहलीचे आयोजन करण्यात आले.नुकतेच 50 ज्येष्ठ नागरिक करंजाडे येथून पंढरपूर करता बसने रवाना झाले.यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी रामेश्वर आमरे व त्यांच्या सहकाऱ्यांचे तोंड भरुन कौतुक केले. ज्येष्ठ नागरिकांना सहल घडवून आणण्याचे हे सलग दुसरे वर्ष असल्याचे रामेश्वर आंग्रे यांनी सांगितले.
      ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवून आणण्याच्या उद्देशाने रामेश्वर आंग्रे स्वखर्चाने सदर सहलींचे आयोजन करत असतात.यापूर्वी रामेश्वर आंग्रे यांनी  ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र,निराधारांना आर्थिक सहाय्य,ज्येष्ठ नागरिकांसाठी विनामूल्य आरोग्य शिबिरांचे आयोजन केले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी रामेश्वर आंग्रे सदैव तत्पर असतात. अर्थातच या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांना सहल घडवून आणण्याच्या त्यांच्या उपक्रमाचे समाजाच्या सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.