सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।
कर्जत नगर परिषद क्षेत्रात करमरकर यांच्या निवासस्थानापासून हायवे पर्यत कृषी संशोधन केंद्राच्या लगत बांधण्यात येणाऱ्या आर सी सी बांधकाम करण्यात येणाऱ्या मुख्य न्यायालयाच्या कामाची पाहणी मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी केली व मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत मुख्यनाल्याचे बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित ठेकेदाराला दिल्या.
वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून 3 कोटी 61 लाख 54 हजार रुपये खर्च करून करमरकर यांच्या निवासस्थानापासून हायवे पर्यंत कृषी संशोधन केंद्राच्या लगत 550 मीटर लांबीचाआरसीसी मुख्य नाल्याचे बांधकाम सुरू आहे. नाल्याचे बांधकाम रचना कट्रक्शन कंपनी करीत आहे, नाल्याचे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे, या कामाची पाहणी मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नगर अभियंता मनीष गायकवाडयांनी केली यावेळी कंपनीचे प्रतिनिधी सुनील टेकवाणी उपस्थित होते.सदर नाल्याचे काम मार्च अखेरीस पूर्ण करावे अश्या सूचना मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी संबंधित ठेकेदाराला दिल्या.








Be First to Comment