सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
गेली अनेक वर्षे काॅग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून विविध सामाजिक कामे करणारे रसायनीतील चांभार्ली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अशोक मुंढे यांची रायगड जिल्हा काँग्रेस सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र काॅग्रेसचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप हे अशोक मुंढे यांच्या एकावन्न वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेली त्यांनी अशोक मुंढे यांना वाढदिवसाची भेट म्हणून रायगड जिल्हा काँग्रेस सरचिटणीसपदी नियुक्त झाल्याचे नियुक्तीपत्र दिले.
अशोक मुंढे हे गेली अनेक वर्षे काॅग्रेस पक्षाचे काम करीत आहेत.त्यांनी माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून पक्षाचे काम करावे तसेच काॅग्रेस पक्षाला रायगडमध्ये बलकटी देण्यासाठी अशोक मुंढे यांच्या सारख्या कार्यकर्त्यांची गरज असल्यानेच आज त्यांना रायगड जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी देत असल्याचे महाराष्ट्र काॅग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांनी बोलताना सांगितले.








Be First to Comment