Press "Enter" to skip to content

घारापुरी ग्रामपंचायतीतर्फे महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिर

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।

महिला बचतगटातील महिलांना संक्षम करण्याच्या हेतूने ग्रामपंचायत घारापुरीचे वतीने स्तुत्य स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबीर उपक्रम राबविला. सरपंच बळीराम ठाकुर यांनी श्रीफळ वाढवून शिबिराचे उद्घाटन केले.

घारापुरी हे जागतिक किर्तीचे वारसा लाभलेले पर्यटनस्थळ असल्याने येथील ग्रामस्थ लहान मोठी कटलरी दुकाने तसेच स्टाॅल लाऊन पर्यटकांवर अवलंबून व्यवसाय करतात आणि याच व्यवसायाअंतर्गत ग्रामस्थांची उपजीविका चालते.मात्र कोरोना लाॅकडाऊनच्या काळात पर्यटक बंदीमुळे येथील ग्रामस्थांना व्यवसाय बंद राहील्याने त्यांचेवर उपासमारीची वेळ आली होती. गेली आठ महिने बंद असलेला व्यवसाय नोव्हेंबर महिन्यापासून पर्यटकबंदी उठविल्याने सुरू झाला आहे. मात्र अजूनही पाहीजे तसे पर्यटक बेटावर येत नसल्याने येथील व्यवसाय रुळावर आला नाही.

त्यामुळे येथील ग्रामस्थांना स्वयंरोजगार उपलब्ध करून दिल्यास महिलाबचत गटातील महिला संक्षम होतील, हा उद्देश समोर ठेवून ग्रामपंचायतीने हा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे येथील महिलांना आकर्षक वस्तू बनवून पर्यटकांना विकता येतील. तसेच अन्य ठिकाणी सुध्दा ह्या वस्तू विकता येतील.
तीन दिवसाकरीता सुरू करण्यात आलेल्या शिबिरामध्ये अगरबत्ती बनविणे,पर्स बनविणे,कापडी बॅग बनविणे,पर्स मेकींग,ईमिटेशन ज्वेलरी बनविणे,आदी वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सदरचे शिबिरात महिलागटातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. शिबिराच पहिल्या दिवसी अगरबत्तीचे प्रशिक्षण देण्यात आले आणि महिलांकडुन अगरबत्ती बनवुन पॅकिंग करण्यात आले.

त्यामुळे सदरच्या प्रशिक्षणामुळे स्वयंरोजगार सुरु करण्यास चालना मिळेल याची खात्री महिलांचे चेह-यावर दिसत होती. तसेच आपल्या हाताने बनविलेल्या अगरबत्ती देवाच्या चरणी ओवाळणार याचा आनंद महिलांनी व्यक्त करून दाखविला.

शिबिर यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच श्री.बळीराम ठाकुर, उपसरपंच श्री सचिन म्हात्रे,सदस्य श्री मंगेश आवटे, श्री भरत पाटील, सदस्या सौ ज्योती कोळी, सौ.मीना भोईर, सौ.सुभद्रा शेवेकर,ग्रामसेवक श्रीम.संचिता केणी तसेच शिबिराचे मार्गदर्शक कृपासिंधु सामाजिक संस्थेच्या सौ.विधी विजय मोरे आणि त्यांचे सहकारी यांनी प्रयत्न केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.