सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
विभागीय कर्तव्यदक्ष अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या वैशिष्टपूर्ण कामिरिगी बद्दल त्यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक पुरस्कार जाहीर झाला असून ती दुस-यांदा या पदकाचे मानकरी ठरले आहेत.
देवेंद्र प्रभाकर पोटफोडे यांचे जन्म 1968 रोजी मुंबई येथे झाले त्यांनी सन 1991 मध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन दलात दाखल झाले. महामंडळात विविध पदांवर काम करताना वसाहतीतील विविध दुर्घटना अत्यंत समर्थपणे हाताळल्या आहेत. आशिया खंडामध्ये एकमेव असलेल्या अशा भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर येथून अग्निशमनातील उच्च अभियांत्रिकी पदविका सुवर्णपदकाचे मानकरी ठरून प्राप्त केली . अभियांत्रिकी बरोबर त्यांनी एम.बी.ए.(एच.आर ) ही पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त केली .
अग्निशमन क्षेत्रातील विविध यंत्रणा, उपकरणे व पद्धती यांचा सखोल अभ्यास करण्याकरता शासनाने यांना जर्मनी , ऑस्ट्रिया ,जपान ,इंग्लंड यासारख्या प्रगत राष्ट्रांमध्ये पुरस्कृत केले .राज्य शासनाने त्यांची अग्निशमन राज्यातील सेवेसाठी उपकरणे व यंत्रसामुग्री यासाठी खरेदी करावयाच्या समितीमध्ये टेक्निकल एक्स्पर्ट म्हणून नियुक्ती केली आहे .
राज्यशासनाने श्री पोटफोडे यांच्या कर्तव्य तत्परतेची दखल घेऊन पुणे शहरासारख्या राज्यातील द्वितीय क्रमांकाच्या मोठ्या शहराच्या अग्निशमन सेवेचे मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून प्रतीनियुक्ती केली त्यांच्या कालावधीत त्यांनी विविध लोकोपयोगी व जनजागृतीपर अनेक उपाय योजना केल्या.पुणे शहरामध्ये आयोजित केलेल्या काॅमन युथ गेममध्ये सुमारे शंभर देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग होता .या स्पर्धेसाठी पंतप्रधान ,राष्ट्रपती व अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.या स्पर्धेच्या संपूर्ण अग्निसुरक्षेची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली .
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये विभागीय अग्निशमन अधिकारी कोकण या अत्यंत धोकादायक ज्वलनशील ,रासायनिक उद्योगधंदे असणाऱ्या कार्यक्षेत्रात कार्यरत राहून या अंतर्गत येणाऱ्या विविध जबाबदाऱ्या अग्निशमन कायद्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली असून , त्याशिवाय अग्निशमन विभागासाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री खरेदी प्रक्रिया ,नोकर भरती यासारख्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.
श्री. पोटफोडे यांच्या दैदिप्यमान कामगिरीचा आढावा घेऊन त्यांच्या अग्निशमन सेवेतील वैशिष्ट्यपूर्ण कामाची नोंद घेऊन भारताच्या माननीय महामहीम राष्ट्रपतींनी यांना सन – २०११ मध्ये अग्निशमन सेवेचे “राष्ट्रपती पदक ” प्रदान केले आहे .
सध्या पुण्यामध्ये चीफ फायर ऑफिसर
पी.एम.आर.डी.ए.म्हणून कार्यरत आहेत . पुण्यातील त्वष्टा कासार समाज संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात ते उपस्थित राहून सर्व प्रकारे मार्गदर्शन व सहकार्य करतात.
अशा कर्त्यव्यनिष्ठ व कार्यतत्पर अधिकाऱ्यास त्वष्टा कासार समाज संस्थेच्यातर्फे तसेच समाजातील विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांनी अभिनंदन देत पुढील उज्वल वाटचाली करिता शुभेच्छांचा वर्षाव होत आहे..








Be First to Comment