सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
प.पू.पांडुरंगशास्री आठवले विद्यामंदिर अष्टमी मराठी शाळा कँर.३ येथील मुख्याध्यापिका नम्रता नारायण पानसरे यांना शिक्षक गौरव पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला आहे.
कोरोना १९ कालावधीत कोरेना सेवा बजावत असताना त्यांनी आॅनलाइन शिक्षण व आॅफलाइन शिक्षण सुरू ठेवून झेड.पी.लाइव्ह, पनवेल डाएट व औरंगाबाद येथील उपक्रमात सक्रीय सहभाग घेवून राज्य स्तरावर विद्यार्थाना मार्गदर्शन केले.त्यांच्या या कोरोना महामारीचे कालातील शैक्षणिक व सामाजिक कामगिरीची दखल घेऊन झेड.पी.लाइव्ह एज्युकेशन शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकविण्यासाठी झेड.पी.लाइव्ह एज्युकेशन आयोजित घरातूनच आँनलाईन शाळा सुरू झाली.या आँनलाईन शाळा उपक्रमाकरिता महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम पाठ शिकवून विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवले.झेड.पी.लाइव्ह एज्युकेशन,पनवेल डाएट व जि.प.औरंगाबाद प्रशासनाकडून सदरचे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.एक उपक्रमशील शिक्षिका म्हणून सर्वांच्या परिचयाच्या असणाऱ्या नम्रता पानसरे यांना मिळालेल्या शिक्षक गौरव पुरस्काराने त्यांचे शालेय प्रशासन, सर्व शिक्षकव्रुंद तसेच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी त्यांचे अभिनंदन व्यक्त करून शुभेच्छा दिल्या आहेत.








Be First to Comment