सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
युथ फोरम सोशियल असोसिएशन यांच्यावतीने रसायनीतील रिस येथील प्रकाश गायकवाड यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना कर्मविर दादासाहेब गायकवाड जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
सन २०१७ पासून सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक , कला , क्रिडा , पत्रकारीता , उद्योजक , राजकिय व प्रशासकिय क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महत्वपूर्ण व्यक्तिंचा गौरव होत असतो . आपले समाजाप्रती असलेले प्रेम , जिव्हाळा व त्यासाठी लागणारी त्यागमय भावना लक्षात घेवून आम्ही आपणास या वर्षीचा युथ फोरम सन्मान २०२१ अर्थात ” कर्मविर दादासाहेब गायकवाड जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सन्मान चिन्ह , शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप असून सदर पुरस्कार रविवार दि . ७ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ठिक ५.०० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येईल असे नियुक्तीपत्रात म्हटलं आहे.प्रकाश गायकवाड यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना याअगोदरही विविध पुरस्कार मिळाले आहेत.








Be First to Comment