एजिओक्रीस्ट, सेन्डी पॅक ऑईल, गौरी ॲसिड,शारदा फेब्रीकेशन या चार कंपन्यांना लागली भीषण आग
तळोजा एम. आय. डी.सी मध्ये आगीचे सञ सुरूच
सिटी बेल लाइव्ह । वचन गायकवाड । तळोजा ।
तळोजा एम. आय. डी. सी. च्या परिसरातील पडघे येथील नविन केमिकल झोनमध्ये आज दिनांक 9 फेब्रुवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास एजिओक्रीस्ट ऑग॔नाईझ कंपनी प्लाॅट. नं. 34 या कंपनीला अचानक आग लागली. या आगीने भीषण रूप धारण केला असून एजिओक्रीस्ट या कंपनीच्या शेजारी असलेली सेन्डी पॅक प्लाॅट नं. 33 व गौरी ॲसिड प्लाॅट. नं.32, शारदा फेब्रीकेशन प्लाॅट नं 35 या तीन कंपन्यांनी सुद्धा पेट घेतला असून या तीन कंपन्यासुद्धा जळून खाक झाल्या आहेत.
या कंपनीत ऑईल चे ड्रम असल्यामुळे या आगीत मोठे स्फोट होत आहेत. या स्फोटांमुळे आगीने तांडव रूप धारण केलेले दिसून आले आहे.सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नसल्याचे चर्चा चालू असून या आगीमध्ये तीन ही कंपन्यां जळून खाक झाल्या असून कंपनीचे मोठे नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे.

घटनास्थळी आग विझविण्यासाठी तळोजा अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करीत असून त्यांच्या मदतीला पनवेल अग्निशामक दल, दिपक फरटिलायझर कंपनीच्या अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोचल्या असून आग विझविण्याचे काम करीत आहेत. तब्बल पाच तास झाले तरी आग अजून आटोक्यात आली नसल्याचे तसेच जिवित हानी संबंधी माहिती आग विझल्यानंतर पाहणी केल्या शिवाय देता येणार नाही. तसेच आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.असे तळोजा विभागीय फॅक्टरी ऑफीसर अजित मोहिते यांनी दिली.
घटनास्थळी तळोजा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी व कम॔चारी उपस्थित आहेत.








Be First to Comment