Press "Enter" to skip to content

उरणमध्ये तेल तस्करांच्या मुसक्या आवळल्या

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।

उरण मोरा सागरी पोलीस ठाण्यामध्ये तेल तस्करांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. सदरची कारवाई पनवेल क्राईम झोन 2 च्या माध्यमातून करण्यात आली आहे. उरण तालुक्याला मोठा सागरी किनारा लाभला आहे. तर जेएनपीटी बंदरासारखे जागतिक स्थरावरचे बंदरही याच हद्दीमध्ये आहे.

यामुळे येथील सांगती भागामध्ये मोठ्याप्रमाणात जहाजांची वर्दळ सुरू असते. याचाच फायदा घेत येथील सागर किनार्यावर तेल तस्कर सक्रिय झाले आहेत. या तेल तस्करांच्या माध्यमातून समुद्रामध्ये उभ्या असणाऱ्या जहाजांमधून तेल काढून या तेलाची तस्करी करण्यात येते. सदरची तस्करी उरणच्या किनार्यावरून होत असून, येथील तस्करांचा शोध अनेक वर्षं सुरू आहे.

रविवारी मध्यरात्री पनवेल क्राईम झोन 2 च्या एका पथकाने उरणच्या पणजा खाडीमध्ये धाड टाकून कारवाई करत तेल तस्करीसाठी वापरात आलेली बोट आणि तीन हजार लिटर मोटर स्पिरिट तसेच हायस्पीड डिझेल असा एकूण 12 लाख 40 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. या तस्करीमधील अखिलेश वसंत रावकुमार, लक्षमन पप्पू वाल्मिकी (चेटा) आणि दिनेश अर्जुन गायकवाड (कड्या) या तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, भा.द.वी कलम 286, 34 सह जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 37 सह मोटार स्पिरिट अँड हायस्पीड डिझेल ऑर्डर 2005 चे क्लॉज 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.