सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।
कर्जत नगरपरिषद हद्दीतील आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोव्हिड काळात केलेल्या कामाबद्दल त्यांना कोव्हिड योद्धा म्हणून नगरपरिषदेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित कर्जत नगरपरिषद हद्दीतील कोव्हिड काळात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कोव्हिड योध्यांचा नगरपरिषदेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले होते. मात्र वेळे अभावी या सर्व कर्मचाऱ्यांचा सन्मान करणे शक्य नसल्याने प्रत्येक कार्यालयाचे प्रतिनिधी म्हणून अधिकारी यांना यावेळी सन्मानित करण्यात आले होते.

कोरोना महामारीत संपूर्ण जग, देश लॉक डाऊन होता, मात्र अत्यावश्यक सेवेत आपल्या जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारी यांना नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी आपल्या दालनात बोलावून प्रत्येक आरोग्य कर्मचारी यांना ‘कर्जत नगर परिषद अंतर्गत कोव्हिड साथीच्या काळात आपण कर्तव्यनिष्ठ राहून आपल्या जिवाची पर्वा न करता सामाजिक भान ठेवून समाजासाठी करत असलेले कार्य प्रशंसनीय आहे आपल्या अमूल्य सेवेला सलाम करत आपणास योद्धा म्हणून कर्जत नगरपरिषदेच्या वतीने सन्मानित करीत आहोत’ असे लिखित स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी कार्यालयीन अधिक्षक जितेंद्र गोसावी, अरविंद नातू, आरोग्य विभागाचे सुदाम म्हसे,अविनाश पवार, डी. के. गायकवाड उपस्थित होते.








Be First to Comment