सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।
नागोठण्याजवळील शिहू- नवीन मुंढाणी येथील सामाजिक सभागृह न बांधता खोटे बिल काढून अपहार केला गेला असल्याचा आरोप करून संबंधित अपहारकर्त्यांवर कारवाई व अपहारीत रक्कम वसुल करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होण्यासाठी व न्याय हक्कासाठी निवृत्त ग्रामविकास अधिकारी पेण तालुक्यातील शिहू गावातील जेष्ठ समाजसेवक के. के. कुथे यांनी २ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा रायगड जिल्हाधिकारी यांना एका निवेदना मार्फत दिला होता.
परंतु येत्या १५ दिवसात संबंधित कामा बाबत योग्य ती चौकशी करून अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाईल असे लेखी आश्वासन राजिपचे बांधकाम कार्यकारी अभियंता के. वाय. बारदस्तकर यांनी के. के. कुथे यांना दिल्यानंतर कुथे यांनी आपल्या उपोषणास तुर्तास स्थगिती दिली असून संबंधित अपहार प्रकरणाला पुढे काय दिशा मिळते याबाबत संपूर्ण शिहू पंचक्रोशीला उत्सुकता लागलेली आहे.
राजिपच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयातून के. के. कुथे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, के. के. कुथे, जनार्दन कुथे व शिहू येथील इतर ग्रामस्थ यांनी ११ जानेवारी २०२१ रोजी मुंढाणी येथील सामाजिक सभागृह बांधकामाबाबत अपहार झाल्याची तक्रार केली असून सदर कामाची राजिप बांधकाम विभागामार्फत चौकशी पत्र प्राप्त झाले आहे. सदर कामाची राजिप बांधकाम विभागामार्फत येत्या १५ दिवसाच्या कालावधीत योग्य ती चौकशी करून अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाईल. याबाबत न्याय न मिळाल्यास आपल्या स्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा त्यामुळे आपले उपोषण आपण तुर्तास स्थगित करावे. असा दिलासा तूर्तास मिळाल्यानेच आपण हे उपोषण तात्पुरते स्थगित करीत असल्याचे कुथे याांनी सांंगितले.








Be First to Comment