Press "Enter" to skip to content

पनवेलमध्ये बर्निंग कारचा थरार

पनवेल परिसरात दोन चालत्या वाहनांना लागली आग

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर ।

पनवेल परिसरातील कळंबोली व खारघर या ठिकाणावरुन जाणार्‍या दोन चार चाकी वाहनांना अचानकपणे लागलेल्या आगीत वाहनांचे नुकसान झाले असले तरी कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.

पनवेलजवळील कळंबोली महामार्गावरुन जाणार्‍या सॅन्ट्रो गाडीला अचानकपणे दुपारच्या वेळेस आग लागली. तत्परतेने गाडीचा चालक गाडी बाहेर आला. या आगीत गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसर्‍या घटनेत खारघर येथे सुद्धा व्हॅगेनर गाडीला अचानकपणे आग लागली होती.

गाडीतील व्यक्ती गाडीबाहेर पडल्याने त्यांना कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. या आगीत दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. तसेच काही काळासाठी वाहतूक खोळंबली होती.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.