Press "Enter" to skip to content

लगोरी स्पर्धेस उत्स्फूत प्रतिसाद

कोकण विशानेमा ज्ञाती मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या कोकण स्तरावरील क्रीडा स्पर्धा संपन्न

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।

कोकण विशानेमा ज्ञाती मंडळ व लोणेरे विभाग यांच्या वतीने संपूर्ण कोकण विभागातील गुजराती समाजाचे क्रिडा स्पर्धेचे आयोजन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापिठ लोणेरे येथे करण्यात आले होते.यामध्ये बॅडमिंटन व गोळा फेक ह्या क्रीडा स्पर्धांसोबत ह्या वर्षी प्रथमच आपला पारंपारिक लगोरी खेळांच्या स्पर्धा ह्या महाराष्ट्र लगोरी संघटनेच्या सहकार्याने आयोजीत करण्यात आले होते.

लगोरी स्पर्धेत मोठ्या प्रमाणात लहानांपासून जेष्ठांपर्यंत अनेकांनी सहभाग घेतला विशेषतः महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लगोरी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेसाठी आकर्षक चषक व भरघोस रक्कमेचे रोख पारितोषिके ठेवण्यात आले होते.

या स्पर्धेचे उदघाटन प्रमुख पाहुणे, राष्ट्रीय पदक प्राप्त तुषार भाई दोशी (डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस ) यांच्या हस्ते लगोरी खेळाचे उगमस्थान ज्यांच्याकडून झाले असे भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेला हार घालून करण्यात आले त्यानंतर दीप प्रज्वलन करून व ओपचारीकरित्या लगोरी फोडून करण्यात आले.या प्रसंगी पाहुणे म्हणून शिवछत्रपती पुरस्कार विजेते,लगोरी संघटनेचे संदीप गुरव,प्रदिप भाई गांधी (अध्यक्ष को.वि.ज्ञा. मंडळ),रुपेश भाई शेठ(युवा अध्यक्ष,को.वि.ज्ञा.युवा मंच), सुबोध मेथा (उपाध्यक्ष को.वि.ज्ञा.मंडळ) लगोरी संघटनचे तांत्रिक मार्गदर्शक भरत गुरव यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या स्पर्धेत महिलांमध्ये जोगेश्वरी लगोरी टीम (इंदापूर )च्या संघाने सुवर्ण कामगिरी करीत विजेतेपद मिळविले. उपविजेतेपद हिरकणी (लोणेरे) संघाला मिळाले. पुरुषांच्या गटात जयदेव ए लगोरी टीम (माणगांव) संघाने विजेते पद, तर उपविजेतेपद लोणेरे युवा मंच लगोरी टीम संघाला मिळाले. सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पुरुषांच्या गटात सेहूल शेट,रिषभ मेथा यांनी पुरस्कार मिळविले.

या स्पर्धेतून निवडलेला संघ पुढे लगोरी लीग साठी तसेच राज्य स्पर्धेच्या कॅम्प साठी सहभागी होतील असे लगोरी संघटनेचे गुरव यांनी सांगितले.

तसेच गोळाफेक स्पर्धेत पुरुषांच्या गटात सेउल शेठ प्रथम तर तेजस शेठ,
महिलांच्या गटात प्रथम क्रमांक स्नेहल दोशी, द्वितीय क्रमांक प्राची शेठ,
बॅडमिंटन डबल स्पर्धेत खुल्या पुरुषांच्या गटात प्रथम क्रमांक सुमित मेहता व तुषार दोशी, तर द्वितीय क्रमांक जगेन शेट व रोहित गांधी, महिलांच्या गटात प्रथम क्रमांक मिताली शेठ व मयुरी शेठ,
तर द्वितीय क्रमांक कोमल मेहता व अंकिता मेथा,१४ वर्षांखालील बॅडमिंटन डबल स्पर्धेत प्रथम क्रमांक रिया दोशी व आर्या गांधी, तर द्वितीय क्रमांक निल शेठ व श्रीश शेठ,बक्षीस वितरण समारंभ शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते,भारतीय लगोरी संघटनेचे अध्यक्ष,संदीप प्रल्हाद गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत,प्रदिप भाई गांधी (अध्यक्ष को.वि.ज्ञा. मंडळ),रुपेश भाई शेट(युवा अध्यक्ष,को.वि.ज्ञा), सुबोध मेथा,किरण मेथा आदी मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. स्पर्धेत पंच म्हणून दीप मेहता, सुमित मेहता, करमले सर, जुगेन शेठ, तुषार दोशी यांनी, तर प्रमुख तांत्रिक मार्गदर्शक भरत गुरव व को.वि.ज्ञा.सर्व कार्यकारी मंडळाच्या टीममधील रसिका मेथा,रिशम मेथा,विक्रांत मेथा, विक्रांत मेथा,हर्ष शेठ, ओंमकार मेथा, रुद्र मेथा तसेच उदय गांधी,कन्हेया मेथा यांनी विशेष परिश्रम घेतले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.