सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
कोरोना महामारीत शाळा बंद झाल्या परंतु शिक्षण मात्र सुरूच होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी वेध जिप लाईव्ह शिक्षण घरातून सुरू झाली ऑनलाईन शाळा या उपक्रमात धुतुम शाळेच्या प्राथमिक शिक्षिका सौ. स्मिता संतोष म्हात्रे यांनी सहभाग घेऊन पाठ सादर करून राज्यातील शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवण्याचे महत्वाचे काम केले.
तसेच बोलणारी पुस्तके या उपक्रमाअंतर्गत इयत्ता १ पहिली भाषा व इंग्रजी विषयाच्या अनेक कवितांचे आपल्या सुमधुर आवाजात गायन केले.
सदर ऍपचे उद्घाटन औरंगाबाद येथे दि. ४ फ्रेबुरवारी रोजी शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाई कडू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी सौ. स्मिता संतोष म्हात्रे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या कार्या बद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








Be First to Comment