काही मागण्या मान्य तरी काही प्रलंबित
सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
कोरोनामुळे पालकांकडे विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकरिता पैसा राहिला नाही.शिवाय लाॅकडाऊनमध्ये अनेकांच्या नोक-या गेल्या.कोरोना महामारीत आर्थिक परिस्थिती खुपच बिकट झाल्याने सर्वसामान्यांना शालेय फि भरणेही मुश्किल झाले आहे. काही दिवसांपासून शाळांकडून पालकांना शुल्क भरण्यासाठी सक्ती केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत.शिक्षण संस्थांच्या फि विषयक अरेरावीमुळे पालक मेटाकुटीला आला आहे.
विद्याथ्यांकडून पन्नास टक्के शुल्क घ्यावे अशी मागणी ठिकठिकाणी होताना दिसत असतानाच रसायनी तील मोहोपाडा येथील प्रिआ स्कूल पालक संघटनेचा फि शुल्क कमी करण्यासाठी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक कांबळी यांच्या नेतृत्वाखाली विरोध दर्शविला आहे.मोहोपाडा प्रिआ स्कूल हे इंग्रजी माध्यम असून सध्या येथे १८६३ विद्यार्थी सन २०२० जानेवारी अखेरपर्यंत शिक्षण घेत आहेत.
कोरोना काळातील शालेय शुल्क निम्मी घ्यावी यासाठी प्रिआचे पालक आक्रमक झाले असून न्याय मिळेपर्यंत लढा देण्याचा निर्णय सर्व पालकांनी घेतला आहे.सन २०२० मधील फि शुल्क सवलत मिळावी यासाठी पालकवर्गांकडून मागणी होत आहे.
यावर तोडगा निघावा यासाठी चर्चा बैठकीचे आयोजन प्रिआ स्कूल शाळेच्या आवारात करण्यात आले होते. यावेळी प्रिआ स्कूलच्या वतीने चर्चेसाठी रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हाईंस प्रेसिडेंट व्हि.डी.परांजपे, थरमॅक्स कंपनीचे एस.व्ही.कदम,प्रिआचे एक्झिक्युटिव्ह गुरव, शालेय मुख्याध्यापिका जोसी जोसेफ आदी तर पालकांच्यावतीने मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक कांबळी यांच्या नेतृत्वाखाली संजय पाटील, भास्कर डुकरे, प्रशांत खरात, संतोष म्हात्रे, प्रणित ठाकूर,राकेश खराडे, अरुण महाडिक,राजू खेडेकर, मंगेश पाटील, निलेश बाबरे, अजित जोशी,प्रणाली ठाकूर, उर्मिला ठोंबरे, स्वप्निल खाने तर शाळेबाहेर असंख्य पालक उपस्थित होते.
या चर्चेंत पालकांनी विविध विषय मांडले.यात ट्युशन फि व्यतिरिक्त इतर फि उदा.डिजिटल फि, कम्प्युटर फि,टर्मं फि,अॅक्टिव्हिटी फि, लायब्ररी, सायन्स लॅब फि आदी लाॅकडाऊनमुले शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा वापर न केल्याने सदर फि माफ करण्यात यावी,अॅसेसमेंट फि म्हणून ४०० रुपये प्रत्येकी घेण्यात आले ती माफ करावी, नर्सरी ते इयत्ता पहिली पर्यंत वेगवेगळ्या प्रकारे तीनवेळा फि घेण्यात येते त्याची रक्कम कमी करुन एकदाच घ्यावी, इयत्ता दहावीचा रिझल्ट शंभर टक्के लागावा म्हणून इयत्ता नववीमध्ये ब-याच विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक नापास करण्यात येते त्यांना सतरा नंबरचा फाॅर्मं भरुन बाहेरुन दहावीची परीक्षा द्यावी लागते.हि पध्दत बंद करण्यात यावी,प्रिआच्या स्कूल कमिटीमध्ये पालकांच्या वतीने चार सदस्य घेण्यात यावे, गणवेश,वह्या, पुस्तके इत्यादी खरेदी करण्यास पालकांना स्वातंत्र्य असावे आदी मागण्या पालकांच्या वतीने करण्यात आल्या या मागण्यांना हिरवा कंदील मिळाला असून इतर फिविषयक येत्या नऊ दिवसांत निर्णय देण्यात येईल असे व्हि.डी. परांजपे यांनी बोलताना सांगितले.
इतर फिही शंभर टक्के माफ झालीच पाहिजे अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करणार असल्याचा इशारा पालकांच्यावतीने मनसे जिल्हा उपाध्यक्ष दिपक कांबळी यांनी दिला आहे.








Be First to Comment