Press "Enter" to skip to content

उरण शहर हद्दीतील गावठाण वाढीचा विस्तार करण्याची मागणी

उरण तालुका सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष शेखर पाटील यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना दिले निवेदन

सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनिल ठाकुर ।

उरण शहरातील गावठाण वाढीच्या विस्तार करणेबाबत उरण तालुका सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष शेखर पाटील व सचिव वाघ सर यांनी नगरपालिका मुख्याधिकारी संतोष माळी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

उरण शहरातील आनंदनगर कामठा विजयनगर कामगार वसाहत श्रीराज नगर विमला तलाव परिसर हा अजूनही सजा चाणजे हद्दीतील मोडतो आहे यामध्ये सर्व्हे नंबर 73,74,75,79,81 इत्यादी चा समावेश आहे या परिसरात 1995 सालापासून मोठया प्रमाणात इमारती झाल्या आहेत सजा चाणजे भागाककरिता एक पॉईंट एक एफसाय 1 .1fsi आणि शहराच्या इतर भागाकरिता एक पॉईंट आठ 1 .8 व दोन एफएसआय आहे सजा चाणजे भागाला हा वाढीव एफसाय चा फायदा मिळत नाही या परिसरात मोठ्या प्रमाणात इमारती झाल्या असून लोकवस्ती झाली आहे सध्या च्या परिस्थितीत या इमारती जुन्या झाल्या असून पुनर्विकासा च्या प्रक्रियेत आहेत.

या भागाला वाढीव एफसाय म्हणजे दोन एफसाय चा फायदा मिळाला पाहिजे म्हणूनच उरण नागरपालिकेमध्ये समाविष्ट असलेल्या सजा चाणजे हद्दीतील सर्व सर्व्हे नंबर उरण नगरपालिका गावठाण मध्ये समाविष्ट करावे या परिसरात जवळपास पाच हजार नागरिक रहात आहेत त्यांचे व त्यांच्या पुढील पिढचे भले होईल याचा सहानुभूती पूर्वक विचार करावा शासन नियमानुसार शहराची दर दहा वर्षांनी गावठाण हद्दीत वाढ झाली असती तर हा भाग गावठाण हद्दीत त्यावेळी आला असता या क्षेत्राच्या बाजूला सिडको हद्दीत 4 टक्के एफसाय आहे.

त्यामुळे सजा चाणजे जे उरण नगरपालिका हद्दीतील आहे त्यावर अन्याय झाल्यासारखे आहे याबाबत मुख्याधिकारी यांनी सकारात्मक विचार करणार असल्याचे सांगितले या प्रश्ना बाबतलेखी उत्तर देण्यात येणार आहे लवकरच नगरविकास मंत्री व इतर मान्यवर याना महासंघाच्या वतीने निवेदने देण्यात येणार आहेत व उरणकरांना न्याय मिळावा यासाठी साकडे घालण्यात येणार आहे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.