सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
रस्ता सुरक्षा अभियान सप्ताह निमित्ताने
कोलाड पोलीस ठाणे व वाहतूक शाखा यांचे वतीने नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संस्थेच्या श्री.रा.ग.पोटफोडे (मास्तर)विद्यालय व द.ग.तटकरे ज्युनि.काँलेज खांब येथे विद्यार्थी वर्गाला रस्ता सुरक्षा वाहतूकीचे नियमांबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थी वर्गानेही याबाबत चांगले प्रोत्साहन देऊन वाहतूकीचे धडे गिरविले.
रस्ता सुरक्षा अभियान जिल्हा वाहतूक पोलिसांच्या मार्फत संपूर्ण रायगड जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या वाहतूक सप्ताह सुरक्षा अंतर्गत
कोलाड पोलीस ठाणे व वाहतूक शाखा यांचे वतीने शुक्र.५ फेब्रुवारी रोजी सदरचे विद्यालयात विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षा व वाहतूकीचे नियम याबाबत मार्गदर्शन करून रस्ते सुरक्षा अभियान राबविण्यात आले.
यावेळी कोलाड ए.पी.आय.जाधव, पोलिस कॉन्स्टेल तडवी,पोलिस हवलदार पाटील,पोलिस हवलदार देशूमुख,महिला पोलिस कॉ्स्टेबल तावडे,मुख्याध्यापक सुरेश जंगम,सहा.विक्षक चिंदू धामणसे, सुप्रिया क्षीरसागर,विनायक चितळकर, प्रुथ्वा धनावडे, ज्ञानेश्वर पोटफोडे,अन्य शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.स्वत:ची सुरक्षितता म्हणजेच रस्ता सुरक्षा हे प्रत्येकाने ध्यानात ठेऊन सार्वजनिक ठिकाणी आपले वर्तन केले तर निश्चितच शंभर टक्के अपघाताचे प्रमाण कमी होतील अशाप्रकारचे मार्गदर्शन ए.पी.आय. जाधव यांनी यावेळी केले.








Be First to Comment