Press "Enter" to skip to content

डॉ.संतोष बोराडे हैदराबाद येथे ग्लोबल एक्सलन्स 2021पुरस्काराने सन्मानित

सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पाताळगंगा ।

संगीत क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा स्वतंत्र ठसा उमटविणारे आणि,गेली अनेक वर्षे आपल्या वाणीमधून अनेकांना मंत्रमुग्ध करणारे खालापूर तालुक्यातील, कलोते गावातील डॉ.संतोष दत्तात्रय बोराडे यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येत असून, नुकताच त्यांना “अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया” यांच्या तर्फे शिवरामपल्ली, हैदराबाद येथे “ग्लोबल एक्सलन्स राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात संगीत चिकित्सा आणि आरोग्य या विषयात उल्लेखनीय कामासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध डॉ. संतोष बोराडे, यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्माचिन्ह,सन्मापत्र,शाल,श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप होते.

अभिजात शास्त्रीय संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून, अखिल मानवजातीच्या अंतर्बाह्य विकासासाठीचे पायाभूत शास्त्र आहे, असे जनमानसात रुजवत ते आपल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून जगभर भारतीय अभिजात कलांचा प्रचार प्रसार करत आहेत. त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांना ते स्वखर्चाने तयार करत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देत असून समाजाभिमुख कलाकार घडविण्याचे कार्य ते करत आहेत.

गेली २१ वर्षे २००० हुन अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यक्रम करून त्यांनी आपल्या या कार्याची धुरा समर्थपणे पेलली आहे.आधुनिक विज्ञान व सांस्कृतिक वारसा या दोन्हींचाही उत्तम मेळ असणाऱ्या जीवनसंगीत या कार्यक्रमातून ते लाखो लोकांच्या आयुष्यात सकारात्मकतेचा प्रकाश पोहोचविण्याचे काम करीत आहेत.२.५ लाखाहून अधिक विद्यार्थी, १५ हजाराहून अधिक शासकीय अधिकारी, आयएएस व आयपीएस अधिकारी तसेच १० हजाराहून अधिक रुग्णांपर्यंत त्यांनी आपले प्रबोधन पोहोचवले आहे.

यावेळी हा पुरस्कार वितरण करण्यासाठी अँटी करप्शन फौंडेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष . नरेंद्र अरोरा, दिल्ली, आंतरराष्ट्रीय कार्यकारी अधिकारी शोभीता कोकितकर, गडहिंग्लज, सुप्रसिद्ध सिने अभिनेता रझा मुराद, तसेच तेलंगणा राज्यातील विविध उद्योजक, व संपूर्ण भारतातून आलेले विविध मान्यवर उपस्थित होते.आपले विचार संगिताच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहचवित असतांना सातासमुद्रापार यशाची शिखरे गाठणाऱ्या डॉ.संतोष बोराडे यांचे समाजातील सर्वच स्तरांमधून कौतुक होत आहे.

संगिताच्या माध्यमातून आपले विचार अनेकांपर्यंत पोहचवित असतांना त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यामुळे जीवनसंगीत" कार्यक्रमातून जागतिक स्तरावर ख्याती मिळाली आहे. यावेळी हा पुरस्कार आपल्याला घडविणाऱ्या आपल्या आई चरणी व वारकरी संप्रदायाच्या संतांच्या चरणी समर्पित करीत असल्याचे मत डॉ. संतोष दत्तात्रय बोराडे-कलोते यांनी व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.