सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
केंद्र सरकारच्या पेट्रोल व डिझेल दरवाढी तसेच वाढती महागाई याचा निषेध करण्यासाठी आज शिवसेना उरण तालुका व शहर यांच्या वतीने माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उरण शहर शाखेपासून मोर्चाची सुरुवात होऊन उरण शहरात बैलगाडीने प्रवास करत मोर्चा काढण्यात आला या मोर्चात केंद्र सरकारच्या महागाई, कामगार विरोधी, शेतकरी कायद्या विरोधी धोरणांचा निषेध करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या, सदर मोर्चाची रॅली उरण बाजारपेठ फिरून उरण चे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी केंद्र सरकारच्या महागाई, पेट्रोल- डिझेलचे वाढणारे दर, कामगार विरोधी कायदे, खाजगीकरण, शेतकरी कायद्या विरोधी धोरणांचा आपल्या भाषणातून निषेध केला.


सदर निषेध मोर्चा प्रसंगी तालुका संपर्कप्रमुख जे.पी.म्हात्रे, उरण नगरपालिका गटनेते गणेश शिंदे, पंचायत समिती सदस्य हिराजी घरत, उपतालुका प्रमुख जयवंत पाटील, प्रदीप पाटील, उपतालुका संघटक के एम् घरत, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, मा.शहरप्रमुख महेंद्र पाटील, वाहतूक तालुका अध्यक्ष चेतन म्हात्रे, ग्राहक सं.कक्ष पंकज सुतार, विभागप्रमुख एस्. के. पुरो, संदेश पाटील, नगरसेवक अतुल ठाकूर, नगरसेविका वर्षा पाठारे, शहर संघटक दिलीप रहाळकर, महिला संघटक ममता पाटील, महिला तालुकासंघटक भावना म्हात्रे, शहर संघटिका सुजाता गायकवाड, मेघा मेस्त्री, वंदना पवार, विना तलरेजा, श्रद्धा सावंत उपशहर प्रमुख अरविंद पाटील, उपशहरप्रमुख गणेश पाटील, ग्रा.सं.कक्ष धिरज बुंदे, शाखाप्रमुख अनिल पाटील, युवासेना चेतन पाटील, मिलिंद भोईर, संजय गावंड, रूपेंद्र गुडेकर, संजय मेश्राम, आजी माजी पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment