शिक्षणाचा महामेरू शिक्षण महर्षी ज्ञानसागर अभाळा एवढं मोठ मन
विशाल मेरु परी कर्तुत्व आवरे गावातील शिक्षण सम्राट , शिक्षण महर्षी प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे सर, आवरे गाव हे संपुर्ण उरण पंचक्रोशीतील एक सर्वक्षेत्रात प्राविण्य मिळविलेलं गाव होय. आवरे गावाला प्राचीन असा इतिहास आहे आणि आवरे गाव म्हणजेच विशेष नर रत्नाची खाण होय, महाराष्ट्राच्या नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात आवरे गावाचे नाव नेण्याचा कित्येक महापुरुषांनी काम केलं आहे मग ते सामाजिक क्षेत्रात असो , मनोरंजनच्या क्षेत्रात असो अथवा शैक्षणिक असो खरच मला ज्यांच्या कर्तृत्वाबद्दल विशेष आदर वाटतो अश्या या महामेरुरूपी उत्तुंग अश्या व्यक्तित्वासमोर माझे शीर नतमस्तक होते सदा लीन होत ते आमच्या ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे सर आदरणीय साहेब मुळातच जन्म 1जून 1952 रोजी एका सर्वसामान्य अश्या कुटुंबात झाला वडील महादेव विष्णू म्हात्रे हे त्या काळात डुबकी मारून रेती काढणे ह्या व्यवसायात काम करत असत व माता आनंदीबाई महादेव म्हात्रे ह्या गृहिणी . लहानपणी कमालीची कुशाग्र बुद्धिमान असलेले सर हे आवरे गावात तुफान्या ह्या टोपण नावाने ओळखत असत आणि खरच बुद्धिमतेचा विशाल सागर असणारे हे विलोभनीय व्यक्तिमत्त्व जिथे जातील तिथे आपल्या वक्तृत्वाचे सकारात्मक तुफान निर्माण करत. लहानपणी गरिबी ही सरांनी अगदी जवळून पहिली आहे परंतु जर आपल्याकडे शिक्षण असेल तर आपण काहीही करू शकतो हाच आत्मविश्वास आणि हीच जिद्द मनात ठेवून मग परिस्थिती काहीही असो पहिल्यांदा शिक्षणाचा ध्यास धरा उद्या येणारे उज्ज्वल भविष्य आपले असेल हाच मूलमंत्र प्रत्येक पालक असेल किंवा श्रोता वर्गाला आपल्या भाषणात सांगत असे गाव हे म्हणजे माय भूमी ही आवरे गाव आणि या आवरे गावाचे थोरसुपुत्र म्हणजेच आदरणीय साहेब कर्मवीर अण्णांच्या कमवा आणि शिका या ब्रीद वाक्याने प्रेरित होऊन आपले शालेय व महाविद्यालयिन शिक्षण अगदी प्रतिकूल परिस्थितीत पूर्ण केले आणि स्वतः शिक्षणाची मुहूर्तमेढ ही आवरे गावाहून कोसो दूर असलेल्या मुंबईतील विक्रोळी सारख्या विभागात शिक्षणाची ज्ञान गंगा ही गोरगरीबांच्या विकासासाठी रोवली आणि आपल्या कार्याचा ठसा उमटवत साहेबांच्या व संस्थेचे उपक्रम व कार्य खूप महान आहे पदवी महाविद्यालय , महिला महाविद्यालय, विधी महाविद्यालय रात्र महाविद्यालय, तंत्रनिकेतन महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय ,माध्यमिक विद्यालय व प्राथमिक विद्यालय असे असंख्य असे संस्थेचे एकूण उपक्रम 73 , संस्थेत एकूण 23000 हजार विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत आणि कार्यरत कर्मचारी 650 आहेत. अनेक लोकोपयोगी कामांना मूर्त स्वरूप देण्याचं कार्य हे प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे सर यांनी केलं .सर यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केल्याचा तर अभिमान आहे पण ज्या हाल अपेष्टा आपण शालेय जीवनात भोगल्यात त्या आपल्या स्वकीय किंवा आपले बंधू भगिनी लहान थोर यांच्या वाट्याला येऊ नये या यासाठी अतिशय महत्वाचा आणि खूप खूप महान निर्णय घेत आदरणीय साहेब यांनी 1992 साली शिक्षणाची ही ज्ञान गंगा अपार कष्टाने 1992 साली रामचंद्र म्हात्रे विद्यालय आवरे या मध्यमिक विद्यालयाची स्थापना केली व ग्रामीण भागातील शिक्षणाची जी काही समस्या होती ती मात्र कायमची मिटवून टाकली या शिक्षणाचे जे रोपटं लावल हळूहळू या वृक्षाचे मात्र वटवृक्षात रूपांतर झाले म्हणजे माध्यमिक ते उच्च माध्यमिक विद्यालय, तिन्ही शाखांतील कला , वाणिज्य आणि विज्ञान , अस तसेच तांत्रिक शिक्षण हे आवरे गावात मिळायला लागले ज्युनिअर कॉलेज ते उच्चमाध्यमीक विद्यालय सुरू करून शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनची समस्या दूर केलं तसेच मुंबई सारख्या ठिकाणी शाळा सुरू केल्या म्हात्रे सर हे स्वतः उच्च शिक्षित असून बृहन्मुंबई महापालिका शिक्षण समितीवर त्यांची नेमणूक झाली 1999ते 2001 अशी खरच शिक्षण क्षेत्रात उत्तुंग अशी भरीव कामगिरी केल्या बद्दल शिक्षक गौरव पुरस्कार 1995-96 च्या राष्ट्रीय शिक्षक कल्याण प्रतिष्ठान तर्फे बृहन्मुंबई यांच्या वतीने मुबई विद्यापीठ चे माजी कुलगुरू प्रा. रामजोशी सर यांच्या प्रमुख उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे महापौर सन्मानीय मिलिंदजी वैद्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं, तसेच आदरणीय म्हात्रे साहेब यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तसेच आवरे गावाचे नाव शैक्षणिक क्षेत्रात अति उच्च पातळीवर नेणारे सर यांचा 2020 रोजी निगा फौंउडेशन आवरे तर्फे निगा रत्न हा बहुमान देण्यात आला .अश्या या उत्तुंग व्यक्तिमत्त्व समोर सोनेरी झालर असलेला सूर्यनारायण सुद्धा नतमस्तक आहे असे साहेबांचे व्यक्तिमत्वाचे तेज आहे आणि विशेष म्हणजे 2008 साली महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डच्या सदस्य पदी नेमणूक झाली अशा रीतीने बोर्डच्या सदस्याच्या हातात हात घालून कामकरण्याची संधी साहेबांना मिळालेली विशेष म्हणजे सर यांचे संस्था आणि संस्थेतील विशेष सहशालेय उपक्रम हे यावर बारीक लक्ष होय सतत राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांनी कमिगिरी करून अव्वल राहणं हे संस्थेच्या विद्यार्थी चे वैशिष्ट्य होय सर म्हणजे दूरदृष्टीने विचार करणारे प्रगल्भ व्यक्तिमत्व होय. ज्ञानप्रसाराक शिक्षण संस्था स्थापना करण्याचे उद्दिष्ट समोर त्या अनुषंगाने प्रत्येक लहान लहान घटकापर्यंत पोहोचणे हे साहेबांच्या कर्तुत्वाचे विशेष वैशिष्ट्ये होय तसेच संस्थेच्या विकासाची पाऊले ही हातात पकडली आणि तशी वाटचाल सुद्धा केली आणि संपुर्ण पणे आपल्या समवेत आपल्या कुटुंबातील सर्वांचे कार्य हे विशेष आहे आपल्या कुटुंबातील सर्व म्हणजे प्रत्येक सदस्य हा विद्यादान सेवेशी निगडित असल्याने कार्य करताना आदरणीय साहेब यांना विशेष अडचणी निर्माण होत नसत खरच आपलं जिवन हे अखंड अस शिक्षण क्षेत्राला वाहणारे हे अभाला एवढं मोठ मन विशाल मेरु परी कर्तुत्व आवरे गावातील शिक्षण सम्राट , शिक्षण महर्षी प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे सर दिनांक 21 जाने 2021 रोजी आपल्यातुन अचानकपणे निघून गेले आदरणीय साहेब यांच्या आत्म्याला चिरशांती मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
निवास गावंड सर आवरे उरण 9221345869








Be First to Comment