Press "Enter" to skip to content

पेशाने शिक्षक असलेल्या खंडणीखोर पञकारांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

बातमी छापून बदनानी करण्याची धमकी !!! दोन खंडणीखोर पत्रकारांना पोलीसांनी रंगेहाथ पकडले !

सिटी बेल लाइव्ह । माणगांव । प्रमोद जाधव ।

माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागवून त्यासंदर्भात बातमी छापून बदनानी करण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या दोन खंडणीखोर पत्रकारांना स्थनिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि गोरेगाव पोलीसांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले.

तक्रादर रमेश भोजा शेट्टी रा. पुणे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग येथे येऊन त्यांच्या मौजे शिलीम ता.माणगाव येथील 28 एकर शेतीमध्ये शासकीय योजना राबविल्या आहेत त्यामध्ये पंतप्रधान मत्स्य संवर्धन योजना लाभ घेतला, परंतु प्रत्यक्षात काम केले नाही म्हणून पत्रकार भिवा पवार आणि राजन पाटील यांनी त्यांना माहिती अधिकाराखाली अर्ज करून माहिती घेवून ती प्रसिद्ध करून बदनामी करीन अशी धमकी देत होते. सदर प्रकरण मिटवण्यासाठी म्हणून 5 लाख मागणी केली होती तक्रारदार यांनी घाबरून तडजोडीअंती 2 लाख देण्याचे मान्य केले आहे असे सांगून त्या दोघांविरुद्ध खंडणीची तक्रार दिली..

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. नावले व पथकाने गोरेगाव पोलीस ठाण्याचे हद्दीतील मुंबई-गोवा हायवेच्या बाजूला, आंनद नगर, लोणेरे ता. माणगाव येथे पंचासह सापळा लावून दोन्ही आरोपींना तक्रारदार यांच्याकडून ठरल्याप्रमाणे 2 लाख रुपये खंडणीच्या सरूपात स्वीकारत असताना ताब्यात घेण्यात आले आहे.

दोन्ही आरोपीत हे सरस्वती विद्या मंदिर वडघर मुद्रे, ता. माणगाव येथे 2007 पासून शिक्षक म्हणून काम करत असून. शिक्षकाची नोकरी करत करत “न्यूज २४ तास मराठी” या चॅनेलचे प्रतिनिधी म्हणून काम करतात.

आरोपींकडून रोख रक्कम 2 लाख, 2 मोबाईल असा एकूण 2,33,800/- रु. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

वरील दोन आरोपीविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाणे l गुन्हा  रजिस्टर. 10/2021 भा. द.वि.सं. कलम. 384,506,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई श्री. अशोक दुधे, मा.पो.अधीक्षक,रायगड, श्री.
सचिन गुंजाळ, मा.अतिरिक्त पो.अधीक्षक, रायगड, आणि श्री दयानंद गावडे, पो.निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली स्था. गु.शाखेकडील सपोनि. श्री. नावले, पोलीस हवालदार सूर्यवंशी, शेलार, पोलीस नाईक सावंत यांनी छापा टाकून सदर ची कारवाई केलेली आहे.

संपूर्ण जिल्ह्यात “न्यूज २४ तास मराठी” मार्फत अनेक पत्रकार नियुक्त केलेले आहेत. त्यामध्ये प्रत्येक पत्रकाराच्या ओळखपत्रावर स्पष्टपणे सूचना नमूद केलेली आहे की, “ओळखपत्राचा गैरवापर केलेला आढळल्यास सदस्यत्व रद्द केले जाईल व कायदेशीर कारवाई केली जाईल.”

त्यानुसार ओळखपत्राचा गैरवापर करणाऱ्या सदरच्या दोन पत्रकारांची नियुक्ती रद्द करण्यात येत आहेत.

– किशोर केणी, मुख्य संपादक
“न्यूज २४ तास मराठी” वेब न्यूज

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.